कोणत्या दिवशी टाकून द्यावे.?? ते घरात ठेवल्याने काय होते.? जुने कपडे बिघडवू शकतात तुमचं नशिब जुने कपडे कुणाला द्यावे.??

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आपल्याला नेहमीच नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते. विशेषतः स्त्रियांना कपड्यांचे खूप आकर्षण असते. कुठे सेल लागला, बाजारात नवीन ट्रेंड आला की तो आपल्या कपाटात असायलाच हवा.

असे करून आपण नवीन कपड्यांची खरेदी करत राहतो. अशाने कपड्यांचा ढीग तयार होत राहतो. इतके कपडे गोळा झाले की त्यांचा वापर होत नाही. नवनवीन फॅशन किंवा आवड म्हणून हे कपडे घातले जातात.

व तसेच आपल्या कपाटात ते पडून राहतात. असे करून कपाट पूर्ण भरून जाते. मग गरज वाटते ती जुने कपडे बाहेर काढण्याची. मग आपल्याला न आवडणारे, व्यवस्थित फिटिंग मध्ये न बसणारे, लहान मोठे होणारे, फाटलेले, शिलाई निघालेले असे सर्व कपडे बाजूला काढतो.

मग अशा जुन्या व फाटक्या कपड्यांचे आपण काय करावे?
फाटलेले कपडे कधीही घालू नयेत. कपाटात खूप कपडे असूनही एखाद्या वेळेला असे होते की आपला जीव एखादा ड्रेस वर अडकलेला असतो तो ड्रेस आपला आवडता असल्यामुळे तो कधी जुना झाला फाटला तरीसुद्धा आपल्याला तो टाकून द्यावासा वाटत नाही.

मग तो ड्रेस कसा घातला जातो. परंतु फाटके कपडे घातल्याने आजारांमध्ये वाढ होते. आपल्याला दुःख आणि त्रासाचा सामना करावा लागतो. आणि याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

म्हणून ड्रेस फाटलेला असेल तर तो टाकून द्यावा किंवा शिवून मगच घालावा. फाटलेले किंवा शिलाई निघालेले अंडरगारमेंट्स घातल्याने मानसिक आजार होऊ शकतात. तसेच कपड्यांचा संबंध हृदयाशी असल्याने हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो.

फाटलेले कपडे घातल्याने आपल्या ऊर्जेचा क्षय होतो. तसेच कमरेखालील कपडे फाटलेले असतील तर आपल्याला शनि दोषाचा सामना देखील करावा लागू शकतो.

आपण जे कपडे वापरत नाही परंतु ते चांगल्या अवस्थेत आहेत, फाटलेले नाहीत असे कपडे आपण गरीब व गरजू व्यक्तींना देऊ शकतो. परंतु आपले जुने कपडे इतरांना देताना ते दोन व्यवस्थित घडी करूनच द्यावेत.

आपण अंगावरून काढलेले कपडे न धुता तसेच कोणालाही देऊ नयेत. जुने कपडे कधीही शुक्रवार किंवा शनिवारीच घरातून बाहेर काढावेत. आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढायची असेल तर शनिवारीच आपल्या घरातून जुने कपडे बाहेर काढावेत.

आपण जुने कपडे बाहेर काढले की त्यातून घरातील स्वच्छतेसाठी नरम, मऊ, सुती कपडे बाजूला काढून ठेवतो. परंतु त्याचे कधीही गाठोडे बांधून ठेवू नये ते व्यवस्थित घडी करून एका ठिकाणी मांडून ठेवावेत आणि वरचेवर त्या कपड्यांना उन्हात वाळवावे.

म्हणजे त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा जमा होणार नाही. कारण आपण तीन महिने ज्या वस्तूंना हात लावत नाही त्याठिकाणी नकारात्मकता आणि दारिद्र्य निर्माण होते.

म्हणून वरचेवर या कपड्यांना घरात बाहेर करत रहावे. तसेच ते पडू देऊ नयेत. त्यामुळे त्यांच्यावरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याशिवाय शिवारात वापरले जाणारे कपडे जसे रजाई, ब्लॅंकेट, गाद्या, स्वेटर यांनाही थोड्या थोड्या दिवसात उन्हात ठेवावे.

म्हणजे हे कपडे खराब होत नाहीत व त्यावर नकारात्मक ऊर्जाही जमा होत नाही. जुने झालेले, वापरात नसलेले अंडरगारमेंट्स कधीही कोणालाही देऊ नयेत. असे सर्व कपडे एकत्र करून जाऊन टाकावेत किंवा कचराकुंडीत टाकून द्यावेत.

आपण जेव्हा नवीन कपड्यांची खरेदी करतो तेव्हा ते वापरायला काढण्यासाठी शक्यतो सणवार, शुभ दिवस, बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवारी हे नवीन कपडे परिधान करायला सुरुवात करावेत. हे दिवस नवीन कपडे घालण्यासाठी शुभ दिवस असतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *