मुंबईच्या ताज हॉटेलची कमाई आणि तेथे काम करणाऱ्या वेटर चा पगार ऐकून तुम्हीही थक्क राहाल!

मुंबई ला स्वप्नाचे शहर म्हटले जाते आणि जो कोणी या मुंबईमध्ये येतो, तो आश्चर्याने चकित होऊन जातो. प्रत्येकाला मुंबई हवीहवीशी वाटू लागते आणि मुंबईतील आणि कशा काही गोष्टी असतात त्या गोष्टींच्या प्रेमामध्ये आपण पडून जातो आणि पुन्हा काही आपल्या गावी जाण्याचे नाव काही घेत नाही. आपल्यापैकी अनेकांनी मुंबई मध्ये फिरत असताना समुद्र पाहायाला जातो जेव्हा आपण तेव्हा गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल हे स्थळ आवर्जून पाहत असतो .ताज हॉटेल ही मुंबईची शान आहे.ताज हॉटेल शिवाय मुंबई दर्शन अपूर्णच म्हणावी लागेल.

या हॉटेलमध्ये मोठे मोठे व्यक्ती श्रीमंत व्यक्ती जात असतात. आपल्यासारख्या सर्व साधारण व्यक्ती साठी ताज हॉटेल मध्ये जाणे आणि तिथे राहणे एक स्वप्नच आहे. या ताज हॉटेलचे मालक कोण आहे? या हॉटेलमध्ये राहण्यासाठी खर्च किती येतो? त्याच बरोबर या हॉटेलमध्ये काम करणारे जे वेटर असतात त्यांचा महिन्याचा पगार किती असतो? याबद्दल तुम्हाला शंका आलेली आहे का? किंवा मनामध्ये कुतूहल निर्माण झालेली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आश्चर्यचकित करणारी ठरू शकते म्हणूनच हा लेख आवर्जून वाचा. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

ताज हॉटेल हे मुंबई शहरातील सर्वात मोठे हॉटेल आहे आणि जर तुमच्या मनामध्ये या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर बद्दल प्रश्न निर्माण होत असेल तर आपणास सांगू इच्छितो की या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरच्या पगार जास्त असतो. सहाजिकच हे सर्वात मोठे हॉटेल असल्यामुळे या हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा पगार सुद्धा जास्तच असणार आहे म्हणूनच या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा दीड लाख पर्यंत असतो.

यांचा बेसिक पगार हा बारा हजार रुपये पंधरा हजार या दरम्यान असतो आणि यांचा एकूण पगार हा एक लाख तीस हजार ते एक लाख एक्कवण हजार या दरम्यान असतो. या पगारामध्ये अन्य गोष्टींचा सुद्धा समावेश असतो ते म्हणजे कमिशन, बोनस ,टिप्स इत्यादी. आपणास सांगू इच्छितो की ताज हॉटेल मध्ये असे अनेक लोक येत असतात ज्यांना या हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या पदार्थांबद्दल अजिबात माहिती नसते म्हणूनच येथे काम करणारे लोक,वेटर पदार्थांबद्दल लोकांना व्यवस्थित माहिती देत असतात. बाहेरगावाहून येणारे जे काही प्रवासी असतात त्यांना अनेक गोष्टींबद्दल सांगणे हे आमचे कर्तव्य असते जरी आपल्याला यांचा पगार जास्त वाटत असले तरी त्यामागची मेहनत सुद्धा खूपच मोठी असते. हॉटेल मध्ये जे कुक असतात त्यांचा पगार सर्व साधारणपणे 80 हजार ते अकरा लाखांपर्यंत असतो.

एवढा पगार मिळणे शक्य आहे कारण की येथे काम करणार्‍या कूकला सर्व गोष्टींचा विचार करूनच अनेक खाद्यपदार्थांची निर्मिती करावी लागते जेणेकरून हॉटेलमध्ये येणारे काही यात्रेकरू असतात त्यांच्या सेवेला उतरणे गरजेचे ठरते. अनेकदा आपण ताज हॉटेलमध्ये द्वारपाल बाहेर पाहत असतो या द्वारपाल चा पगार 50 हजार ते एक लाख पर्यंत असतो.हा द्वारपाल जे काही प्रवासी व पाहुणे ताज हॉटेलमध्ये येत असतात त्यांना स्वागतपूर्व हॉटेलमध्ये आणण्याची जबाबदारी त्यांची असते,त्यांचा मानसन्मान या द्वारे स्वागत करून पाहुणचार केला जातो.

आतापर्यंत आपण ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या पगारांबद्दल जाणून घेतले ,चला तर मग आता आपण ताज हॉटेल मधील काही खाद्य पदार्थांविषयी सुद्धा जाणून घेऊया. जगातील सर्वात महागडे हॉटेल असणाऱ्या पैकी एक हॉटेल ताज हॉटेल आहे.या हॉटेलमध्ये शामियाना , सी लॉन्ज, मसाला क्राफ्ट, स्टार बक यासारखे सुंदर रेस्टॉरंट आहेत. ताज हॉटेलमधील या सर्व रेस्टॉरंट शामियाना रेस्टॉरंट खूप महत्त्वाचे मानले जाते. आणि येथे आपण अनेक प्रकारच्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकतो. या हॉटेलमध्ये एका व्हेज थाळी ची किंमत 2 हजार रुपये एवढी असते.

त्याचबरोबर शामियाना रेस्टॉरंटमध्ये आलू पराठे ची किंमत 585 रुपये एवढे असतील. सर्वसाधारण हॉटेलमध्ये तर आपण आलू पराठा खायला गेलो तर त्याची किंमत आपल्याला 200 ते 300 रुपये असते आणि हीच किंमत ताज हॉटेलमध्ये 585 रुपयांपासून सुरू असते तर आपल्याला कल्पना आलीच असेल की अन्य उत्पादनाची किंमत काय असेल. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती साधारणतः चार ते पाच हजार रुपये एवढे किमतीचे पदार्थ खात असतो. जेव्हापण सी लोंज याबद्दल चर्चा करतो तेव्हा सिलोन हे शामियाना हॉटेल रेस्टॉरंट पेक्षा थोडे खर्चिक आहे.

येथे दोन व्यक्तींचा खर्च चार चार ते सहा हजार यादरम्यान येतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की येथे मिळणाऱ्या चहाची किंमत पाचशे रुपयांपेक्षा जास्त असते. त्याचबरोबर ताज हॉटेल मध्ये थांबण्यासाठी किती खर्च येतो असा सुद्धा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कि या ताज हॉटेलमध्ये 540 पेक्षा जास्त खोल्या आहेत. सर्वसाधारण रूम जेव्हा आपण बुक करतो तेव्हा त्याची किंमत पंधरा हजार रुपये पासून सुरुवात होते आणि जर आपण लक्झरी रूम बुक करत असू तर त्याची किंमत एक लाखापासून सुरुवात होत असते.

एवढे सगळे वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न येत असेल की ताज हॉटेल एकंदरीत कमाई किती असू शकते तर एकंदरीत कमाई 50 ते 60 करोड एवढी असते. या हॉटेलचे वेगळे ब्रांचेस आहेत भारतात सोबतच अन्य देशांमध्ये सुद्धा यांची लोकप्रियता उच्च शिखरावर पोहोचलेले आहे. मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया समोर असणारे ताज हॉटेल याची निर्मिती सर जमशेदजी टाटा यांनी 1903 साली केली होती. ताज हॉटेल मधून गेटवे ऑफ इंडिया जो काही नजारा असतो तो अवर्णनीय आहे म्हणूनच अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती पासून ते अनेक राजे ,महाराजे यांनी ताज हॉटेलमध्ये वास्तव्य केलेले आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखामध्ये सांगीतलेली माहीती आवडली असेल लेख आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *