बघा त्यावेळी कोणते कपडे परिधान करत होते..महीला आधीच्या काळात पण छोटे कपडे घालत होत्या का ?

आजची प्रत्येक महिला समाजासोबत चालण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळेच महिलांसाठी बाजारात आलेल्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करणे ही सवयच बनली आहे. नवीन परंपरेकडे पडलेले पहिले पाऊल मानले जाऊ शकते. त्याच परंपरेची एक झलक स्त्रियांनी परिधान केलेल्या छोट्या कपड्यांमध्ये देखील पाहायला मिळते.

समाजामध्ये असलेले संस्कृतीचे ठेकेदार छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन म्हणून निंदा करत असतात. परंतु प्रश्न हा उठतो की जे लोक संस्कृतीची उदाहरणे देऊन स्त्रियांच्या छोट्या कपड्यांची निंदा करतात त्यांना खरंच संस्कृती विषयी काही माहिती आहे की नाही ? त्यांना माहित आहे का की प्राचीन काळामध्ये सुद्धा महिला अशा प्रकारची वस्त्रे परिधान करत होती ?

असे असून देखील समाजामधील त्यांच्या प्रतिष्ठेला कधीही धक्का लागला नव्हता. प्राचीन काळामध्ये लोक झाडाच्या पानांनी आपले शरीर झाकत होते यामध्ये महिला देखील सामील होत्या. वैदिक काळामध्ये पाहिले तर असे लक्षात येईल की, त्या काळात महिला फक्त एका कापडाने आपले शरीर झाकत होत्या इतिहासकालीन संग्रहांमध्ये आज देखील,

आपल्याला वैदिक काळातील काही दृश्य पाहायला मिळतील. ही दृश्य पाहिल्यानंतर स्पष्ट होईल की, सलवार सूट आणि साडी हे फार उशिराने वापरात आलेले आहेत. बरेचसे भारतीय लोक असे समजतात महिला परिधान करत असलेले कपडे आणि त्यांचे विचार याची शिकवण परप्रांतीयांकडून त्यांना मिळाली आहे परंतु हे बोलणे चुकीचे आहे.

कारण प्राचीन काळात पाहिले असता त्याकाळी स्त्रिया फारच कमी वस्त्रे वापरत होत्या. इ.स तीन पूर्व मौर्य आणि शृंगराजवंशाच्या आजही अस्तित्वात असलेल्या दगडांच्या मूर्ती पाहिल्या तर लक्षात येईल की, त्या काळी स्त्री आणि पुरुष दोघेही आयताकार कपडा शरीराचा खालचा भाग झाकण्यासाठी तसेच शरीराचा वरचा भाग झाकण्यासाठी देखील आयताकार कपड्याचा वापर करत होते.

एवढेच नव्हे तर गुप्तराज वंश यांच्या दरम्यानची अशी छायाचित्रे मिळाली आहेत जे पाहिले असता असे लक्षात येते की, सातव्या व आठव्या शतकामध्ये स्त्रियांचे कमरेच्या वरील व कमरेच्या खालील शरीर झाकलेले असायचे. त्यामुळे कपड्यांवरून स्त्रियांच्या मान सन्मानाची तुलना करणे हे चुकीचे आहे. ला’ज आणि महिलांनी परिधान केलेली वस्त्रे :- भारतामध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी,

वेग-वेगळ्या वातावरण असल्यामुळे त्या वातावरणाशी अनुकूल असलेले कपडे परिधान करण्यास लोकांनी सुरुवात केली. आपल्या देशाचे क्षेत्रीय विविधता फारच आकर्षक होती. जसे की दक्षिण भारतातील काही स्त्रिया आपल्या शरीराचा वरचा भाग झाकत नसायची. इसवी सन पाचशे च्या दरम्याने गुप्त काळामध्ये साडी नेसण्याची सुरुवात झाली होती.

तुम्हाला माहित आहे का साडी या शब्दाची उत्पत्ती वेदांपासून झाली आहे. संस्कृत मध्ये साडी या शब्दाचा एक अर्थ “कपडा” असा होतो. इसवी सन सहाशे पूर्व काळा मध्ये सुद्धा साडीचे वर्णन मिळते. संपन्न परिवारातील महिला चीनच्या सिल्क पासून बनवलेल्या साड्यांचा वापर करत होत्या. तर साधारण परिवारातील महिला सुती साड्यांचा वापर करायच्या.

परंतु डोक्यावर पदर घेण्याची प्रथा या काळात दिसत नव्हती कारण जर तुम्ही रामायण आणि महाभारत पाहिले असेल तर त्यात तुम्हाला सीता, द्रोपदी आणि कुंती कधीही डोक्यावर पदर घेतलेल्या दिसणार नाहीत. मुघलांचा प्रभाव :- पंधराव्या शतकामध्ये मु-स्लिम आणि हिं’दू महिला वेग-वेगळ्या पद्धतीचे वस्त्र परिधान करायच्या.

सोळाव्या आणि सतराव्या शतकाचा प्रारंभ होत असताना पूर्ण भारतावर ती मुघलांची सत्ता होती याचा परिणाम भारतीय वस्त्रांवर सुद्धा दिसत होता. मु-स्लिम समाजातील स्त्रिया पूर्ण कपड्यांचा वापर करायच्या त्यानंतर सलवार सूट प्रचलित झाल्याची मान्यता आहे. आज देखील स्त्रिया सलवार सूट चा वापर करताना दिसतात. बंडी आणि कुर्ती :- व्हिक्टोरिया युग मध्ये काही महिला आपल्या साडीच्या आत ब्ला’उज चा वापर नाही करायची. विक्टोरिया समाजाला हे पसंत नव्हते.

हळूहळू ब्ला’ऊजचा वापर सुरू केला गेला. ज्ञानदांदिनी देवी ज्यांनी ब्लाऊज आणि साडी यांना वापरात आणले. भारतामध्ये स्त्रियांचे पूर्ण कपड्याने शरीर झाकणे हे महत्त्वपूर्ण मानले जाते. बाजारामध्ये आज देखील दिवस तरी पाहिले जातात ती वेग-वेगळ्या संस्कृतीची असतात. भारतामध्ये कपड्यां संदर्भात म्हणजेच कशा प्रकारचे कपडे वापरायचे व नाही याबद्दल लेखी स्वरूपात कुठलाही आदेश नाही.

भारतामध्ये काही शहरांमधील स्त्रिया आपल्या अंगवस्त्रासाठी मुक्त विचारांच्या आहेत. समाजामधील काही लोक स्त्रियांच्या कपड्यांवरती नेहमी प्रश्न करत असतात. परंतु जर असे असले असते तर बुरखा घालणारी स्त्री किंवा सलवार सूट घालणारी स्त्री आज सुरक्षित असली असती. परंतु ज्या ठिकाणी पाच वर्षाची छोटी मुलगी सुद्धा बला त्का राची शिकार होते त्या ठिकाणी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे स्त्रियांचे कपडे नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *