चेहरा इतका उजळेल कि लोक पाहातच राहतील.कोरफड आणि व्हिटॅमिन इ चेहऱ्यावर अशाप्रकारे लावा; !

आपला चेहरा हा आपल्या सौंदर्याचा एक प्रमुख भाग असतो. आपला चेहरा व सौंदर्य खुलविण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो, असाच एक अतिशय महत्त्वाचा उपाय आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या वर उपयुक्त ठरत असते त्याचबरोबर चेहऱ्याच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

बाजारामध्ये अनेक सौंदर्य प्रसाधने आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व सौंदर्यप्रसाधनांमध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणामध्ये असते. आपल्या दैनंदिन जीवनाच्या आहारामध्ये समृद्ध असलेले व्हिटॅमिन ई पदार्थ सुद्धा खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ई ची कमतरता असेल तर त्यामुळे त्वचे संदर्भात तसेच केसांच्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात म्हणूनच आज आपण व्हिटॅमिन ई आणि कोरफड त्या दोघांचा महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण कोरफड ची एक फांदी लागणार आहे म्हणजेच एक कोरफड चा तुकडा घेणार आहोत. आपण अनेकदा बाजारामध्ये जे काही उत्पादने पाहत असतो त्या सर्व उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन ई आणि कोरफड यांचा वापर करून स्क्रब तयार केलेला असतो. जेव्हा उत्पादनामध्ये व्हिटॅमिन ई आणि कोरफड यांचा वापर केलेला आपल्याला आढळतो आणि हे स्क्रब जेव्हा आपण चेहऱ्यावर लावतो त्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील पेशी सक्रिय होतात आणि आपला चेहरा तजेलदार दिसू लागतो.

जरी उत्पादनामध्ये कोरफड असल्याचे सांगत असले तरी त्यामध्ये 100% कोरफड नसते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या बागेमध्ये असणारा कोरफड वापरायचा आहे जेणेकरून तुमच्या त्वचेला शंभर टक्के लाभ मिळू शकेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफडीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचे जे गर आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपल्याला लागणार आहेत.

ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपल्याला या गरांमध्ये टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि अर्धा ते एक तास चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा, असे एक दिवसाआड नियमित केल्याने तुमचा चेहरा पूर्णपणे चमकू लागेल व तुमच्या चेहऱ्यावर जा मृतपेशी आहे त्या पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होणार आहे.

त्याचबरोबर आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अजून एक उपाय सांगणारा होतो म्हणजे हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग वांग असतील ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा ग्लिसरीन एक चमचा गुलाब जल व दोन विटामिन कॅप्सूल टाकायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून कापसाच्या साहाय्याने आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे.

असे निदान पंधरा दिवस जरी आपण केले तर तुमची त्वचा पूर्णपणे चमकू लागणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग, वांग निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून आपल्या चेहऱ्याचे संरक्षण करायचे असेल तर व आपली त्वचा उत्तम बनवायचे असेल तर हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *