तुळशीचे रोप झटपट मोठे आणी हिरवेगार होईल …घरामधील तुळशीच्या रोपाची वाढ होत नसेल तर घरातील हा एक पदार्थ एक चमचा तुळशीच्या कुंडीत टाका .!!

मित्रांनो तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. आयुर्वेदातही तुळशीच्या औषधी गुणधर्मांबाबत सांगितले आहे. कोणी धर्म, श्रद्धा म्हणून तर कोणी आरोग्यविषयक कारणांसाठी घरात तुळस ठेवतो. प्रत्येक घरात एक तरी तुळस असतेच. पण तुळशीबाबत अनेकांची तक्रार असते की तुळस खूप लवकर सुकते. अनेकदा व्यवस्थित पाणी घालूनही तुळशीची पानं गळतात. तुळशीचं झाड सुकण्याची अनेक कारणे असू शकतात. उष्णता, गरमीमुळे तुळशीचे झाड सुकते असा अनेकांचा अंदाज आहे, तर एखाद्याला वाटते की तुळशीचे झाड हिवाळ्यात दवांमुळे खराब होते.

पण जेव्हा काही लोकांचे तुळशीचे रोप पावसाळ्यातही टिकू शकत नाही, तेव्हा त्यांचे सर्व अंदाज चुकतात. कारण तुळशीच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही. एक प्रकारे, असे म्हणता येईल की तुळशीच्या झाडाला जास्त काळजीची गरज नाही, कारण ती उष्णकटिबंधीय वनस्पती आहे, त्यामुळे तुळशीची वनस्पती कमी पाण्यात, कमी सूर्यप्रकाश आणि कमी हवेमध्ये जगू शकते. पण जर ती सारखी कोरडी होऊन पानं गळत असतील तर काही उपाय करून पुन्हा हिरवेगार केले जाऊ शकते. तर मित्रांनो आज आपण असेच काही प्रभावी दोन उपाय पाहणार आहोत हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये असणारे तुळशीचे रोप आहे ते लवकरच मोठे होईल.

तर मित्रांनो यासंबंधीचा पहिला उपाय करत असताना आपल्याला जे तुळशीचे रूप आहे ते एका चांगल्या कुंडीमध्ये लावायचे आहे आणि दोन महिन्याने त्यातील माती बदलणे शक्य असेल तर बदलायचे आहे आणि नसेल तर तीच माती भुसभुशीत करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही टोकदार वस्तूने त्या कुंडीमधील माती व्यवस्थितपणे भुसभुशीत करून घ्यायचे आहे यामुळेही त्या माध्यमातून पोषक घटक एकत्र येतात आणि त्याचा फायदा हा झाडाला होत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण एक आयुर्वेदिक औषध आपल्या घरामध्ये तयार करणार आहोत याचा वापर आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे.

मित्रांनो हे आयुर्वेदिक औषध तयार करत असताना आपल्याला अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचा आहे आणि इमेज आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाल्यानंतर ते एका बाटलीमध्ये कुठून त्याला वर स्प्रे लावायचा आहे आणि हा स्प्रे आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा झाडावर आणि संपूर्ण मातीत मारायचा आहे मित्रांनो यामुळे जे तुळशीच्या झाडांवर जे किटाणू असतात ते दूर होतात आणि त्याचबरोबर तुळशीला झाडाला आवश्यक असणारे पोषक घटक ही मिळतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला तुळशीच्या झाडाची व्यवस्थितपणे निगा ही राखायचे आहे.

यामध्ये दररोज झाडाला पाणी घालायचे आहे त्याचबरोबर झाडाची जी खराब झालेला भाग आहे तोही आपल्याला काढून टाकायचा आहे यामध्ये सुकलेली पाने असतील तर तीही काढून टाकायचे आहे तर अशा पद्धतीने आपण जर हे काही उपाय केले तर यामुळे नक्कीच आपले तुळशीचे झाड आहे काही दिवसांमध्ये खूपच मोठे होईल, आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक समस्या आपल्यातील बऱ्याच जणांच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी संदर्भात येते ती म्हणजे पावसाळ्यात जेव्हा तुळशीच्या रोपामध्ये जास्त पाणी जमा होते, तेव्हा पाने गळू लागतात. याचे कारण झाडाला आवश्यकतेपेक्षा जास्त ओलावा मिळत आहे.

तर मित्रांनो अशावेळी या तुळशीच्या झाडाची मुळे श्वास घेऊ शकत नाहीत आणि परिस्थिती अशी येते की हळूहळू तुळस सुकू लागते. तर मित्रांनो अशावर आपण एक छोटासा उपाय करू शकतो तो करत असताना आपल्याला तुळशीच्या झाडाच्या 20 सेंटीमीटर खालपर्यंत माती खणून काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की जमिनीत ओलावा आहे की नाही. तसे असल्यास, ती कोरडी माती आणि वाळूने भरा पुन्हा कुंडी भरा. यामुळे झाडाची मुळे पुन्हा श्वास घेऊ शकतील. तर मित्रांनो वर सांगितलेले असे हे उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर दररोज झाडाची निगा ही राखा यामुळे तुळशीचे झाड आहे लवकरात लवकर मोठे होण्यास नक्कीच मदत होईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *