‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधली हि अभिनेत्री हॉस्पिटल मध्ये आहे

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत परीच्या मामीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री स्वाती देवलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. स्वातीने लिहिलं आहे,”काल एक छोटी सर्जरी झाली असून आता मी ओके आहे. यावर्षी जाणते, अजाणतेपणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळाले आहेत.

मी मनापासून तुमची आभारी आहे. काळजी तर घ्याचीच आहे. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे”. स्वातीने पुढे लिहिलं आहे,”पूर्वी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी घरी बनवली जायची. पण आता आपण कंटाळा करतो. मोठे झालो..अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधले पदार्थ मित्र-मैत्रिणींसोबत चाखायची सवय लागते…

चटकदार खायची जिभेची सवय जाऊ शकत नाही. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करायचा कंटाळा कसला हो आजही शूटला मी माझा डबा नेते. शरीराचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वत:ला समजायला हवं.” स्वातीने तिच्या पोस्टमध्ये रुपाली भोसलेचेदेखील आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रुपालीने रुग्णालयातील फोटो शेअर करत शरीराची काळजी घेण्याचा सल्ला चाहत्यांना दिला होता.

आता स्वातीने रुपालीचे आभार मानत म्हटलं आहे,”रुपाली भोसले, मैत्रिणी.. तशी मी घाबरटच पण तुझी पोस्ट वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला”. तसेच तिने डॉक्टरांचे, मालिकेच्या टीमचे आणि नवऱ्याचेदेखील आभार मानले आहेत. तिच्या नवऱ्याने म्हणजेच तुषार देवलने पेज बनवून तिला भरवण्यापासून ते पाय दाबून देण्यापर्यंत स्वातीची सेवा केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *