वयाच्या २० वर्षीच झालं या अभिनेत्रीच निधन

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या जास्तीत जास्त वापरामुळे अनेक अनेक जण रातोरात स्टार बनले आहेत. यामध्ये मधल्या काळात सुरू झालेले टिकटॉक या ॲप मधून वेगवेगळे व्हिडिओज बनवून अनेक जण सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर बनत लोकप्रिय ठरले. भारतात देखील या ॲपची बऱ्यापैकी क्रेझ पाहायला मिळाली. या ॲपच्या माध्यमातून नावारूपास आलेले अनेक स्टार आजही प्रसिद्ध आहेत.

कोणी इंस्टाग्राम तर कोणी youtube च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातच नाही तर जगात या स्टार्सला नवीन ओळख मिळाली. अशाच काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पैकी एक स्टारच्या निध#नाची दुःखद बातमी धक्कादायक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सोशल मीडिया स्टार केवळ 21 वर्षांचीच होती. कॅनडाच्या या स्टार च्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडिया वरती चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मूळ भारतीय मात्र कॅनडामध्ये रहिवासी असणारी मेघा ठाकूर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती.

मेघा इंस्टाग्रामवर 101,000 फॉलोअर्ससह सक्रिय होती. तर टिक टॉकवर तिच्या फॉलोअर्सची संख्या ९.३० लाखांहून अधिक होती. मेघा ठाकूर फक्त एक वर्षाची असताना तिचे आई-वडील कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. तिने मेफिल्ड सेकंडरी स्कूलमधून पदवी पूर्ण केली आणि 2019 मध्ये टिकटोक व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. ती तिच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये 60,000 व्ह्यूज आणि 3,000 लाईक्ससह ब्रेकआउट स्टार बनली.

भारतीय वंशाच्या टिकटोकर मेघा ठाकूरचे कॅनडात आकस्मिक निध’न झाले. तिच्या आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. मेघा ठाकूर यांचे गेल्या आठवड्यात म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी अचानक निध’न झाले. मेघा ठाकूर तिच्या व्हिडिओंमध्ये शरीराची सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या मार्गांबद्दल बोलत असे. मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असलेल्या मेघा ठाकूर कॅनडातील ओंटारियो येथील ब्रॅम्प्टन येथे राहत होती. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना मेघाच्या वडिलांनी लिहिले की, ‘जड अंतःकरणाने आम्ही ही दुःखद बातमी देत आहोत.

आमची दयाळू, काळजी घेणारी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूर हिचे 24 नोव्हेंबर 2022 च्या पहाटे अचानक नि’धन झाले.’ मेघाचा फोटो शेअर करत त्यांनी पुढे लिहिले की, ‘मेघा आत्मविश्वासाने भरलेली एक स्वतंत्र मुलगी होती. तिची खूप आठवण येईल. ती तिच्या चाहत्यांना खूप आवडते आणि तिच्या निधनाबद्दल तुम्हाला कळावे अशी तिची इच्छा होती. तिच्या आत्म्याला शांती लाभो, अशी सर्वांनी प्रार्थना करावी.’ दरम्यान, मेघाच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. मंगळवारी तिच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मेघा ठाकूर वर 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी ब्रॅम्प्टन, ओंटारियो येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या आत्म्यास शांती लाभो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *