यामुळे किरण ने अमीर खान ला सोडले

सुरुवाती पासूनच बॉलीवूडमध्ये आपण सर्रास ऐकत, पाहत आलोय कि, या दुनियेतील मंडळी त्यांच्या नातेसंबंधामुळे ते बरेच चर्चेत असतात. आपल्याला त्याचं फारसं वावगं वाटतही नाही पण आजच्या किरण राव आणि आमीर खान यांच्या घटस्फोटाची बातमी हि मात्र सर्वांसाठीच धक्कादायक आहे. कारण हे कपल म्हणजे अनेकांसाठी एक आयडियल कपल होते.

त्यांना चाहते प्रेमाने पावर कपल ही म्हणायचे. किरण किरण राव हिने कदाचित बॉलिवूडमधील सर्वात सामर्थ्यवान पुरुषांपैकी एक असलेला आमीर खानसोबत विवाह केला. त्यांचे वैवाहिक आयुष्य पुढे जात होते तसेतसे ते दोघेही एक वैवाहिक जोडपे म्हणून साधे, आनंदी आणि स्वावलंबी अशी ओळख म्हणून वावरायचे.

 

मुळची बेंगळुरची असलेली किरण ने आपले कर्तुत्व आणि तिची तल्लख बुद्धीमत्ता हि आपल्या बॉलीवूड ला दाखवूनच दिली आहे. त्यानंतर १९९२ मध्ये तीचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले. १९९५ मध्ये तिने सोफिया कॉलेज कॉलेजमधून फूड सायंसची डिग्री घेतली आणि नंतर करिअर साठीचा एक नवीन आणि हटके कोर्स निवडला तो म्हणजे सोशल कम्युनिकेशन्स मीडिया. आणि त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.

ती त्या दरम्यान करिअरच्या योग्य ट्रॅकवर होती. तिने जामिया मिलिया इस्लामिया मधून मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमध्ये मध्ये डिग्री मिळवली. आमिर खानचे प्रोडक्शन हाऊस निर्मित झालेल्या ‘धोबी घाट’ फिल्म किरण राव ने लिहिली होती तसेच ती फिल्म डायरेक्टही केली होती. तसेच पाणी फौंडेशन प्रोजेक्टचे तुफान आलंया हे मराठी गाणे किरण ने गायले होते.

मान्सून वेडिंग फिल्ममध्ये किरण राव ने सेकंड असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच चित्रपटाचा भाग असलेल्या आमीर खानच्या खाजगी आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत होत्या, त्याच्या पहिली पत्नी रीना दत्त २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. कयामत से कयामत तक दरम्यान दोघांचे प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले होते. तब्बल १५ वर्षाचा हा प्रेमविवाह होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *