श्वेता ची खरी जीवन कहाणी पहा

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली आहे. मालिकेत जेव्हा कलाकार ती भूमिका उत्तमरीत्या साकारतो तेव्हा ती मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. या मालिकेत एक व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे श्वेताची. श्वेता ही या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. यात तिची आई म्हणजेच राधा देवकुळे सुद्धा तिला साथ देत असते.

सध्या चालू असणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसत आहे की श्वेताने कार्तिकच्या मनात जो गैरसमज निर्माण करून दिला आहे, तो पूर्ण घराला हलवून टाकणारा आहे. या गैरसमजामुळे घर अस्थव्यस्त झाले आहे. याच खलनायिकेची भूमिका करणाऱ्या श्वेताबद्दल आपण आज येथे माहिती करून घेणार आहोत आणि तिच्या कुटुंबाची सुद्धा.

मालिकेतील दिपाची सावत्र बहीण म्हणजे श्वेता जिचे खरे नाव अनघा अतुल भगरे आहे. अतुल भगरे हे झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘राम राम महाराष्ट्र’ या शोमध्ये बऱ्याच जणांना दिसले असतील. अतुल हे एक ज्योतिषतज्ञ आहेत. श्वेताला म्हणजेच अनघाला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे तिने आजपर्यंत शाळा कॉलेज तसेच इतर ठिकाणीही बरीच नाटके आणि एकांकिका केल्या आहेत.

अनघाचा जन्म २४ जून १९९४ ला नाशिकमध्ये झाला. सीईओ मेरी हायस्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तर महाविद्यालयीन शिक्षण एसएनडीटी कॉलेजमधून पूर्ण झाले आहे. ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेपासून तिने टीव्हीक्षेत्रात पाऊल टाकले. तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून ‘अनन्या’ या नाटकात काम केले आहे. या नाटकात तिने अनन्याची मैत्रीण प्रियाचे पात्र साकारले आहे.

‘व्हाट्सएप लग्न, कुलकर्णी वर्सेस कुलकर्णी’ या चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. यांसारखी अनेक कामे तिने आजपर्यंत केली आहेत. सध्या ती आपल्याला ‘रंग माझा वेगळा’ मध्ये श्वेताची भूमिका साकारताना दिसत आहे. श्वेताला एक भाऊ आहे ज्याचे नाव अखिलेश भगरे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनघाला खऱ्या आयुष्यात बहीण नाही. तुम्हालाही श्वेताची ही भूमिका कशी वाटते आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *