ऑस्ट्रेलिया चा क्रिकेटर असलेल्या मॅक्सवेलने काही दिवासांपूर्वी विनी रमण या भारतीय वंशाच्या मुलीशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी साखरपुडा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. आणि विशेष म्हणजे त्या दोघांचा साखरपुडा हा भारतीय पद्धतीने झाला. काही दिवसांपूर्वी मॅक्सवेल आणि विनी यांनी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला. गेल्या महिन्यात मॅक्सवेलने विनीला लग्नासाठी विचारणा केली होती. त्यानंतर मॅक्सवेलनी साखरपुडाही केला होता. आता या दोघांनी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला. विनीने या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. मॅक्सवेल आणि विनी गेल्या काही वर्षापासून एकमेकांना ओळखतात. या दोघांनी त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. भारतीय पद्धतीने केलेल्या साखरपुड्यासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मॅक्सवेलने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती.
दुसरीकडे विनीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या कपड्यांमध्ये दोघेही खूप छान दिसत होते. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया चा अष्टपैलू क्रिकेटपटू मॅक्सवेलने इंस्टाग्रामवर मुळची भारतीय असलेल्या विनी रमण सोबत विवाह करणार असल्याचे सांगितले होते. मानसिक आरोग्य ठीक नसल्याने मॅक्सवेलने वर्षभर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. या नवविवाहित जोडप्यास साखरपुड्याच्या शुभेच्या देऊया.
Check Also
अशी ही बनवाबनवी मधील शांतनू ची बायको पाहून पागल व्हाल
तुमच्यासाठी आज आम्ही अशा एका कलाकाराबद्दल माहिती घेऊन आलो आहोत जो एका खूपच गाजलेल्या मराठी …