वायरल व्हिडिओ मधील झोमॅटो गर्ल ला झाली अटक

मित्रानो अनेक वाद विवाद आजकाल लोक मोबाईलमध्ये शूट करतात आणि त्याला सोशल मीडियावर शेअर करतात. काही लोक तर नको ते व्हिडीओ पण वायरल करायचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वीच झोमॅटो गर्ल चा व्हिडीओ वेगाने वायरल झाला होता. व्हिडिओमध्ये नक्की चूक कोणाची आहे हे तर तुम्ही पाहून ठरवलं असेलच मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या अटकेबद्दल सांगणार आहोत. होय त्या झोमॅटो गर्ल ला मुंबईत अटक झालेली आहे. नक्की चूक कोणाची आहे हे प्रत्येकजन आपापल्या दृष्टीने पाहतो.

वायरल व्हिडिओमधील झोमॅटो गर्ल चे नाव प्रियंका मोगरे हे आहे. प्रियंका मोगरे हि वारली ला राहणारी तरुणी आहे. तुम्ही जो व्हिडीओ पाहिला त्यामध्ये प्रियंका मोगरे हि अतिशय घाणेरड्या शिव्या देत आहे. पण माणसाला इतका राग का येतो जेव्हा चूक नसेल तेव्हाच एखादी व्यक्ती न घाबरता असे कृत्य करते असे मला तरी वाटते.गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी प्रियांका वाशीमधील सेक्टर नऊ मध्ये आपल्या गाडीजवळ उभी होती. तिची गाडी नियमबद्ध पद्धतीने उभी आहे असे ट्राफिक पोलीस मोहन सलगर याना वाटल्याने त्यांनी तिचा फोटो काढला. फोटो काढल्यामुळेच कदाचित प्रियांकाचा पारा चढला आणि त्याचे रूपांतर मोठ्या वादात झाले. अनेकांना आपला फोटो प्रसारित करायचा नसतो त्यांना त्याचा राग येतो असं कदाचित प्रियंकाला वाटलं असेल. झोमॅटो ची डिलेव्हरी गर्ल असल्याने कदाचित त्यांना सगळीकडे फिरावं लागत. काही वेळातच ते लोक डिलेव्हरी करून दुसरीकडे जात असतात मात्र तरीही पोलिसांनी असे का केले. सध्या मंदीच्या काळात लोकांना नोकरी, काम मिळत नाही. काही हजारांच्या पगारावर लोक अशी नोकरी करतात त्यावर पण अडचण येणार असेल तर लोकांनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, लुटीच्या दृष्टीने अंगावर धावून जाणे, पोलीस हुकूम न मानणे, सरकारी कामात व्यत्यय आणणे ह्या सर्व गुन्ह्यांची कलमे लावून तिच्यावर कारवाई ही करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *