एके काळी आपल्या वडिलांचा मृत्यू देवाकडे मागत होता कपिल शर्मा

कपिल शर्मा: पडद्यावर दिसणारी लोकं अनेकदा दोन प्रकारचे जीवन जगत असतात. पडद्यावर त्यांचे जीवन काही वेगळे असते तर त्यांचे वास्तविक जीवन सुद्धा वेगळ्याच प्रकारचे असते. असं फक्त कोना एका सोबतच नाही तर पडद्यावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत घडत असते. चित्रपटांमध्ये किव्हा कार्यक्रमांमध्ये ते वेग-वेगळ्या भूमिकेत आपल्याला नजर येत असतात, पण त्यांचे पडद्यामागील जीवन हे खूप वेगळे असते. काही लोकं सतत स्टार्स लोकांना त्यांच्या पडद्यावरील जीवनशैली पाहूनच त्यांना त्यांच्या वास्तविक जीवनाशी तुलना करत असतात.

टेलिव्हिसनच्या दुनियेतील खूप मोठे नाव आहे कपिल शर्मा : टेलिव्हिसनच्या दुनियेत सध्या कपिल शर्माचे खूप नाव झाले आहे व त्याला लोकांनी पसंदी हि तितकीच दिली आहे. आता पर्यंत त्याने केलेले सर्व कॉमेडी शो खूप हिट राहिले आहेत. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ नंतर एकदा परत तो त्याचा नवीन शो घेऊन दर्शकांच्या भेटीस येत आहे. कपिल चा नवीन शो ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ २५ मार्च पासून सुरु होणार आहे. जर कपिल शर्मा च्या वास्तविक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर त्याचे जिवण खूपच चढ-उताराने भरलेले आहे. तुम्हाला ऐकून हैराणी होईल कि, कपिलच्या जीवनात एक वेळ अशी देखील होती कि तो त्याच्या वडिलांच्या मृत्यूसाठी प्रार्थना देखील करत होता.पॉकेट-मनी साठी करत होता पिसिओ मध्ये काम : खरं तर २०१४ मध्ये कपिल शर्माचा एका इंग्रजी वेबसाईटने कपिल शर्माची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीमध्ये कपिलने सांगितले कि त्याने त्याच्या वडिलांसोबत खूप कमी वेळ घालवला आहे व त्याचे वडिलांसोबत जास्त बोलणे सुद्धा होत नव्हते. वडिलांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांनी वडिलांना AIIMS मध्ये उपचारासाठी नेले होते. त्या वेळेस तो त्यांच्यासोबतच होता. प्रत्येकाच्या आई-वडिलांचे स्वप्न असते कि माझा मुलगा काही तरी करून पैसे कमवावा पण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्याकडून अशी अपेक्षा कधीही केली नव्हती. १० वि झाल्या नंतर त्याने त्याच्या पॉकेट-मनी साठी पीसीओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आज कपिल त्याच्या वडिलांना खूप मिस करतो, पण त्या वेळेस मी त्यांच्यावरच ओरडत होतो.वडिलांची वाईट अवस्था पाहून त्यांना मृत्यू येण्याची मागणी देवाला करत होते : कपिलने पुढे सांगितले कि त्या दिवसांत मी त्यांना म्हणत होतो कि, बाबा तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त कोणाबद्दल कधीही विचार केला नाही, यामुळेच तुम्हाला कॅन्सर झाला असावा. कपिल ने मुलाखतीत सांगितले कि कॅन्सरमुळे वडिलांची वाईट अवस्था मला बघवत नव्हती त्यामुळे मी देवाकडे प्रार्थना करत होतो कि बाबांना लवकर मृत्यू येऊ देत. त्याने हे पण संगितले कि त्या काळात त्याच्याकडे पैसे नसायचे आणि तो एका भाड्याच्या घरात राहत होता.आज जर वडील जिवंत असते तर त्यांना एक महागडी स्कॉच दिली असती : आज जेव्हा हि काही चांगले होते तेव्हा मी माझ्या वडिलांना आठवतो. कपिल ने सांगितले कि, जर आज वडील जिवंत असते तर त्यांना एक सर्वात महागडी स्कॉच (व्हिस्की) घेऊन दिली असती. जेव्हा त्याला पहिल्यांदा समजले कि त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे त्या वेळेस तो खूप जोरात रडत होता. एका वेळची घटना आहे, एकदा त्याने वडिलांना ड्रिंक करताना पकडले होते व त्या वेळेस त्याचे वडील त्याला म्हणाले कि तू जे काही पाहिलं आहेस ते सर्व विसरून जा कारण मी कधी हि मरू शकतो. तो वडिलांना त्याच्या भावना सांगू शकत नव्हता कारण त्याचे वडील पोलिसात होते त्यामुळे कपिल वडिलांना खूप घाबरत होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *