NMJOKE

कुंकू टिकली आणि टॅटू मालिकेतली कामिनी खऱ्या आयुष्यात

अनेक अश्या मालिका आल्या आणि गेल्या पण लोकांना त्या माहित देखील नाहीत. आपल्या महाराष्ट्रात मराठी वाहिनी झी मराठी आणि स्टार प्रवाह या जास्त पाहिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला कलर्स मराठी वरील एक मालिका ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या विषयी थोडक्यात सांगणार आहोत. तुम्ही जर ती मालिका पाहत असाल तर तुम्हाला मालिकेतील ‘कामिनी’ माहितीच असेल.

कामिनी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रींचे नाव ‘श्वेता पेंडसे’ आहे. श्वेता दिसायला खूपच जास्त सुंदर आहे आणि सोशल मीडियावर ती अनेक सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. श्वेता ने लग्न केले आणि त्यानंतर देखील ती शिक्षण घेत होती. डॉक्टर ची पदवी श्वेता ने घेतली असून तिला आता दोन वर्ष्यांचा एक मुलगा देखील आहे.

नागपूरमध्येच श्वेताचं महेर आणि सासर आहे. सध्या ती मुंबईत आपल्या पती आणि मुलासोबत राहते. श्वेताचा नवरा हा एक फोटोग्राफर आहे आणि तो देखील श्वेताला खूप समजून घेतो तिला मदत करतो. मालिकेमध्ये कामिनी चा अभिनय करणारी श्वेता खऱ्या आयुष्यात खूप मॉडेल दिसते. सध्या तिने लिहलेले ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रदर्शित झाले आहे.

Exit mobile version