NMJOKE

देवमाणूस मधली वंदी खऱ्या आयुष्यात

देवमाणूस मालिका तुम्हाला माहीतच असेल. देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग देखील तुम्ही पाहत असाल. पहिल्या भागामध्ये सुरू आजीची मुलगी वंदी तुम्ही पाहिली असेल. वंदी चा नवरा म्हणजेच सुरू आजीचा जावई देखील तुम्हाला माहित असेल. दोघेही सुरू आजीच्या घरी येऊन राहत असतात आणि मोठ्या मोठ्या बाता मारत असताना तुम्ही पहिले असेल.

पात्राला शोभेल अशी लोक दिग्दर्शक निवडत असतात आणि त्यांच्याकडून अभिनय करून घेत असतात. वंदी चे पात्र देखील खूप सुंदर पद्धतीने साकारले होते. वंदी चे खरे नाव ‘पुष्पा चौधरी’ आहे. पुष्पा चौधरी एक अभिनेत्री आहेत त्या सोबत त्या गायक देखील आहेत. पुण्यामध्ये राहणाऱ्या पुष्पा या एक समाजसेवक देखील आहेत त्यांनी समाजासाठी देखील कार्य केले आहे.

मालिकेत गावढळ भूमिका साकारणारी पुष्पा खऱ्या आयुष्यात सुंदर दिसते. महाराष्ट्र गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. सोशल मीडियावर पुष्पा खूप ऍक्टिव्ह असतात. त्यांना दोन मुली आहेत अशी माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर रिल्स बनवून देखील त्या शेअर करत असतात. तुम्हाला त्यांचा वंदी चा अभिनय कसा वाटला हे नक्की सांगा.

Exit mobile version