NMJOKE

पुष्पा चित्रपटातील मंगल सिनु ची बायको खऱ्या आयुष्यात

पुष्पा चित्रपटाने भारतभर धुमाकूळ घातला आहे. पुष्पा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हिंदी भाषेत प्रदर्शित केला असल्याने याची ओळख भारतभर झाली. लाल चंदनाची तस्करी करण्याविषयी हा चित्रपट आहे. सोशल मीडियावर रोज काहीतरी या चित्रपटाला अनुसरून दाखवले जाते. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे.

आज आपण या चित्रपटातील मंगल सीनू ची बायको विषयी आपण आज पाहणार आहोत. दक्ष्यानी हे पात्र अभिनेत्री ‘अनुसया भारद्वाज’ हिने साकारलं आहे. व्हिलन ची भूमिका तिने उत्तम रीतीने बजावली आहे. १५ मे १९८५ रोजी जन्मलेली अनुसया आता ३६ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. अनुसयाचे माहेरचे आडनाव ‘राव’ असे होते मात्र सुसंक भारद्वाज सोबत लग्न केले असल्याने तिचे आडनाव आता भारद्वाज आहे.

आयांश आणि शौर्य हे दोन मुलं अनुसयाला आहेत. साऊथ मधील चित्रपटांमध्ये तिने अनेक भूमिका केल्या आहेत. पुष्पा चित्रपटामुळे तिची ओळख खूप जास्त वाढली आणि भारतभर ती ओळखीची झाली. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी अनुसया तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. फोटो पाहून तिचे वय इतके जास्त असेल असे वाटत नाही.

Exit mobile version