NMJOKE

लंडन च्या रोडवर भारतीय पोरींनी केला डान्स पाहून गर्व वाटेल

आपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.

आज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. हा व्हिडिओ लंडन येथील साऊथबँक येथे शूट करण्यात आला आहे. या भागात अनेक लोक फिरायला येतात. याचाच फायदा घेऊन काही भारतीय मुलामुलींनी त्या ठिकाणी रोडशो केला. तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की,

त्या गजबजलेल्या भागात एक मुलगी पहिल्यांदा डान्स करायला चालू करते. त्यानंतर त्यांच्याच ग्रुपमधून बाकी काही मुली तिला साथ द्यायला येतात आणि नंतर त्यांचा पूर्ण ग्रुप तिथे डान्स करायला येतो. अनेक हिंदी गाण्यांवर त्या मुलामुलींनी सुंदर डान्स केला. त्यांच्या डान्स स्टेप्स खूप छान आहेत आणि गाणे सुद्धा. येणारे जाणारे पर्यटक त्यांना पाहून दंग झाले.

बऱ्याच जणांनी मोबाईल, कॅमेरा मध्ये शूटिंग सुद्धा काढायला चालू केली. काहींनी त्यांच्याबरोबर डान्स करायला सुद्धा चालू केले. ‘केहते है हमको प्यार से इंडिया वाले’ हे गाणे ज्यावेळी लागते तेव्हा ते ऐकून आणि त्यांचा डान्स पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतात. तुम्हालाही हे गाणे ऐकल्यावर तसे वाटले का? हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version