NMJOKE

या मराठमोळ्या पोराने केले काश्मीरच्या मुलीशी लग्न

भारतीय संस्कृतीमध्ये जर दोन प्रेम करणाऱ्या जोडप्याला एकत्र राहायचे असेल तर लग्न करणे आवश्यक समजले जाते. परंतु जर का कायद्यामुळे ते लग्न होऊ शकत नसेल तर तुम्हाला कसे वाटेल? आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये कराडच्या एका भारतीय जवानाला कश्मीरच्या मुलीवर प्रेम झाले परंतु ३७० क’लम त्यावेळी लागू असल्याने त्यांना लग्न करता येत नव्हते.

अजित पाटील असे या कराडमधील उंडाळे गावातील भारतीय जवानाचे नाव आहे. तो झान्सी येथे भारतीय सैन्यदलात कार्यरत असताना त्यांच्या सहकाऱ्याच्या घरी पाहुणी म्हणून जम्मू काश्मीरमधल्या किस्तवाड जिल्ह्यातील सुमन भगत गेली होती. त्यावेळी सुमन आणि अजित यांची पहिली भेट झाली आणि नंतर प्रेमही झाले.

मार्च २०२० मध्ये सुमनच्या नातेवाईक असणाऱ्या सहकाऱ्याबरोबर अजित जम्मू काश्मीरला १० दिवस सुट्टीवर गेला होता. परंतु कोरोनामुळे झालेल्या तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये अजितला सुमनच्याच घरी तीन महिने राहावे लागले. या तीन महिन्यातच या दोघांचे नाते अजून घट्ट झाले. दोघांच्याही घरून लग्नासाठी होकार होता परंतु ३७० कलम असल्यामुळे ते लग्न नव्हते करू शकत.

ज्यावेळी भारत सरकारने ३७० कलम हटवला तेव्हा अजित आणि सुमन यांच्या आनंदाला थारा राहिला नव्हता. शेवटी २७ नोव्हेंबर २०२० ला मोजक्या कराडकरांच्या उपस्थितीत काश्मीरमध्ये काश्मिरी पद्धतीने अजित आणि सुमन यांचे लग्न झाले. कराडमध्येही आल्यानंतर महाराष्ट्रयीन पध्दतीने लग्न आणि सात फेरे घेण्यात आले. आता ही जोडी आनंदाने संसार करत आहे.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version