NMJOKE

तमाशा मधील या मुलींचे जीवन पाहून तुम्हाला दया येईल

महाराष्ट्राचा लोकप्रिय नृत्यप्रकार म्हणजे तमाशामधील लावणी आहे. तमाशामध्ये अनेक लावण्या सादर केल्या जातात. पूर्वी तमाशे हे बऱ्याच प्रमाणात केले जायचे पण सध्या तमाशाचे प्रमाण कमी झाले आहे. तमाशाला बघायला जाणाऱ्या व्यक्ती या तमाशाला जाऊन आनंद घेतात. काहीजण तर दादागिरी दाखवून पैसेही देत नाहीत.

तमाशासाठी काम करणाऱ्या लोकांचे जीवन हे अतिशय कष्टाचे असते. त्याचाच आज एक व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ पाहून तमाशामध्ये काम करणाऱ्या लोकांना कोणत्या आणि किती अडचणींना सामोरे जावे लागते हे तुम्हाला समजेल. एका ठिकाणी त्यांना जर तमाशा करायचा म्हणले तर बराच सेटअप करावा लागतो.

स्टेज लावावे लागते, फोकस लाईट्स, सर्व तमाशा बघायला येणाऱ्या मंडळींची व्यवस्था करणे अशी अनेक कामे या तमाशामधील व्यक्तींना करावी लागतात. तमाशाचे जीवन हे अत्यंत मेहनतीचे आहे. गनगवळण, रंगबाजी, वगनाट्य हे वेगळे वेगळे कार्यक्रम तमाशामध्ये असतात ज्यांची त्या लोकांना व्यवस्था करावी लागते. जवळपास तमाशाच्या ग्रुपमध्ये ७०-७५ लोक असतात.

सर्वजण त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मिळून बघत असतात. वर्षातून आठ महिने हे लोक काम करतात आणि दोन महिने घरी राहतात. यांच्या मुलांना बऱ्याचदा शिक्षण सुद्धा मिळत नाही. पावसाळ्यात तमाशा करू शकत नाहीत त्यामुळे त्यावेळी सर्वजण विश्रांती घेतात. ज्यावेळी ही लोक दौऱ्यावर असतात त्यावेळी यांना बऱ्याच वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते.

महिलांना तर इतरवेळी गावात फिरताना वाईट सुद्धा बोलतात कारण त्या तमाशात नाचतात. परंतु घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ही कामे करावे लागतात त्याशिवाय त्यांचे पोट नाही भरणार. ज्याप्रमाणे तमाशातील लोक आपल्या महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करतात त्याप्रमाणे आपणही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. तुमचेही याबाबत काय मत आहे, हे कमेंटद्वारे नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version