NMJOKE

जीव झाला येडापीसा मधल्या या कलाकाराचे झाले निधन

टीव्हीवर आपण अनेक मालिका बघतो. काही मालिका संपत असतात तर त्याजागी काही नवीन मालिका सुद्धा निर्मित केल्या जातात. परंतु जर आपल्या आवडीची एखादी मालिका असेल किंवा जी मालिका बघण्यासाठी आपण त्या वेळेची वाट बघत असतो आणि मालिका कधी लागते असे वाटते अशा मालिका आपण कधी विसरत नाही.

 

त्यातील प्रत्येक पात्राने आपल्या मनात घर केलेलं असते. त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांची खरी नावे काय आहेत, ते काय काय करतात हे सुद्धा आपण माहिती करून घेत असतो. तर मित्रांनो अशीच एक तुमच्या आमच्या आवडीची मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ आहे. यातील शिवा आणि सिद्धीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

 

 

काही दिवसांपूर्वीच ही मालिका बंद झाली. तरीही या मालिकेतील जलवा, काकी सरकार, आत्त्याबाई, त्यांचे पीए भावे, सोनी असे अनेक कलाकार अजूनही आपल्या लक्ष्यात आहेत. या मालिकेतील एका कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे. ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील आत्त्याबाईंचे पीए भावे ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे.

त्यांचे नाव हेमंत जोशी असे आहे. भावे हे पात्र बऱ्याच जणांना आवडले होते. हेमंत यांचे निधन कशामुळे झाले हे अद्यापही समोर आले नाही. परंतु आपल्या सर्वांकडून हेमंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Exit mobile version