NMJOKE

मुलगी झाली हो मालिकेतील विलास पाटलाची संघर्षमय कहाणी बायको

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. विलास पाटीलने माऊचा म्हणजेच साजिरीचा स्वीकार केला. विलास हा मनाने खूप चांगला आहे पण जो वाईट वागेल त्याबरोबर तो पुरेपूर वाईट वागणार असा त्याचा स्वभाव या मालिकेत आहे. अहंकारी आणि रुबाबदार तसेच प्रेमळ असा विलास पाटील आहे.

परंतु खऱ्या आयुष्यात विलास पाटील कसा आहे हे आज आपण जाणून घेऊयात. विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव किरण माने आहे. साताऱ्यातील मायणी या गावात ५ एप्रिलला किरणचा जन्म झाला. किरण यांना दोन बहिणी आहेत तसेच त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. ते त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करतात.

शालेय तसेच इंजिनिअरिंगचे शिक्षण हे साताऱ्यामधून पूर्ण केले आहे परंतु याबरोबर त्यांना अभिनयाची आवड सुद्धा होती. सुरुवातीला त्यांनी गाड्यांच्या ऑइलचे दुकान टाकले आणि त्यावेळी घरोघरी जाऊन ऑइल सुद्धा त्यांनी विकले. अभिनय करण्याची संधी त्यांना एका जाहिरातीत बघून मिळाली. त्यानंतर त्यांनी ऑइलच्या दुकानाला कुलूप लावले आणि अभिनय करायला चालू केले.

सुरुवातीच्या काळात बरीच आव्हाने-अडचणी आल्या परंतु सगळ्यांवर मात करत किरण पुढे चालत राहिले. ‘स्वराज्य, श्रीमंत दामोदरपंत, कान्हा, ऑन ड्युटी २४ तास, सख्खा भाऊ पक्का वैरी’ अशा काही चित्रपटात त्यांनी अभिनय केला. ‘अपहरण’ या हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केले आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको, वादळवारे, लक्ष्मी वर्सेस सरस्वती, डॉ बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकांत सुद्धा काम केले.

लॉकडाउन मध्ये काढलेली ‘निजामचाचांची तारांबळ’ ही वेबसिरीज सुद्धा बरीच प्रसिद्ध झाली. सध्या किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारत आहेत. तुम्हालाही विलास पाटील हे पात्र कितपत आवडते? हे नक्की सांगा.

Exit mobile version