NMJOKE

येऊ कशी तशी मी नांदायला मधील मालविका खऱ्या आयुष्यात पहा

मालिका प्रसिद्ध व्हावी यासाठी प्रत्येक मालिकेमध्ये असे एक पात्र असतेच जे इइतरांपेक्षा विचित्र असते आणि त्यामुळे मालिकेला एक वेगळे रुपसुद्धा प्राप्त होते. असेच एक पात्र आहे मालविका. बरोबर ओळखलंत मित्रांनो, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मालविका आता खूपच प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेत नुकतेच आपण पाहिले की, मालविकाने रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला आणि रॉकीला कुत्र्यासारखी वागणूक दिली.

हे करणे खरंच योग्य होत का? किंवा गरजेचं होतं का? तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की सांगा. परंतु करमणुकीच्या नावाखाली असे अपमानास्पद दृश्य दाखवणं कितपत योग्य आहे? बऱ्याच जणांना हे पटले नाही. चला तर मग जाणून घेऊया मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल. मालविकाचे खरे नाव आदिती सारंगधार आहे. तिचा जन्म १६ ऑक्टोबर १९८१ ला मुंबईत झाला.

तिचे लहानपण हे मुंबईत गेले. शालेय शिक्षण रामणारेन रुईया कॉलेज मुंबईमधून झाले आहे. तिला लहान असल्यापासूनच अभिनयाची खूप आवड होती आणि आवड असल्याने बऱ्याच नाटक स्पर्धेत तिने बक्षिसेही पटकावली आहेत. २००९ मध्ये आलेली तिची ‘वादळवाट’ ही पहिली मालिका आहे. त्यानंतर तिने ‘लक्ष्य’ या मालिकेतही काम केले.

‘ती रात्र’ हा तिचा पहिला चित्रपट आहे. ‘होऊ दे जरासा उशीर’ यामध्येही तिने अभिनय केला आहे. आदितीचे २५ मे २०१३ ला सुहास रेवंडेकर बरोबर लग्न झाले. या दोघांना एक मुलगाही आहे ज्याचे नाव अरीन आहे. हे छोटस कुटुंब सुखाने संसार करत आहे. तुम्हाला मालविका कशी वाटते? किती आवडते? आम्हाला सांगायला विसरू नका.

Exit mobile version