NMJOKE

येऊ कशी तशी मी नांदायला मधील ओंकार ची खरी स्वीटू

झी मराठीवर ४ जानेवारीपासून एक नवीन मालिका चालू झाली आहे ती म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. या मालिकेत आपल्याला अभिनेत्री शुभांगी गोखले आणि अनवीता फलटणकर दिसून येत आहेत. अतिशय उत्तम असा अभिनय या मालिकेमध्ये त्या करत आहेत. जसे जसे दिवस जात आहेत तशी ही मालिका दर्शकांना पसंतीस येत आहे.

या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याबद्दल आज आपण येथे माहिती जाणून घेणार आहोत. या मालिकेतील प्रमुख पात्र ओंकार ज्याचे खरे नाव अभिनेता शाल्व किंजवडेकर आहे. शाल्वने आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटक, वेबसिरिस तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचा जन्म २५ एप्रिल १९९६ ला झाला. पुण्यातील अक्षरनंद शाळेतून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातलीच फर्ग्युसन कॉलेजमधून घेतले.

‘छान छोटे वाईट मोठे, नई बहार, चाळिशीतले चोर, गजब कहाणी’ यांसारख्या नाटकांमध्ये काम केले आहे. ‘हंटर’ या हिंदी चित्रपटातही त्याने चांगला अभिनय केला आहे. त्याचबरोबर ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी, बकेट लिस्ट, अँड जरा हटके, एक सांगायचंय’ या मराठी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. त्याच अभिनय दर्शकांना खूप आवडला. ‘अंतरंग’ या लघुचित्रपटाची त्याने निर्मिती सुद्धा केली आहे.

‘से’क्स ड्र’ग्स अँड थिएटर, मेड इन हेवन’ या वेबसिरिज मध्ये शाल्वने काम केले आहे. या सर्व क्षेत्रात अभिनय करून आता आपल्याला शाल्व झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत अभिनय करत आहे. यामध्ये तो शुभांगी गोखले यांच्या मुलाची भूमिका साकार करत आहे. या मालिकेत तो प्रमुख ओंकार याची भूमिका साकारत आहे. तुम्हालाही ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका कशी वाटते, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Exit mobile version