NMJOKE

जवळपास ४० वर्ष्यांपासून पाण्यात असलेले महाराष्ट्रातील या गावातले मंदिर

भारताला प्राचीन इतिहास लाभला आहे त्यात अनेक लोकांनी भारतावर राज्य करून आपली संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न केला. अश्यात जुन्या लेण्या, मंदिरे, मशिदी भारतात पाहायला मिळतात त्यापैकी एक जुने मंदिर आमच्या निदर्शनात आले ज्याला आम्ही भेट दिली होती त्याचे काही फोटो आणि थोडक्यात माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पळसदेव हे गाव आहे. ३५ ते ४० वर्ष्यानंपूर्वी जुने गाव हे पूर आल्याने पाण्यात गेले आणि नवीन गाव बसवण्यात आले.

हजारो वर्षे जुने मंदिर देखील पाण्यात गेले मात्र नवीन गावात तेथील मूर्ती आणून नव्या मंदिराची स्थापना केली. मागील २ वर्ष्यात कडक उन्हाळा असल्याने नदीचे पाणी आटले आणि जवळपास ४० वर्ष्यानंतर मंदिर पाहायला लोकांनी गर्दी केली. या वर्षी देखील मंदिरात बोटीने जाता येते मात्र मंदिरात थोडेसे पाणी आहे तुम्ही आवारात फिरू शकता. मंदिर खूप प्राचीन असल्याने इतिहासप्रेमींना हि सुवर्णसंधी आहे. मंदिरातील दगड, बांधणी, कोरीवकाम असे सर्व काही पाहून माणूस इतिहासात रमून जातो.पळसनाथ देवाचे हे मंदिर आहे या गावात यात्रा देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. अनेक गावातील लोक या गावातील यात्रेत कुस्त्या पाहायला, मंदिराचे देवदर्शन घयायला येतात. हनुमान जयंती च्या दिवशी छबिना निघतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. पळसदेव गावाची प्रगती पाहून हे आधुनिक गाव असल्यासारखे वाटते. सर्वच क्षेत्रात प्रगतीला असणाऱ्या या गावाला तुम्ही आता जरूर भेट देऊ शकता. इंदापूर आणि भिगवण च्या मध्ये सोलापूर महामार्गाला लागून हे गाव आहे या मंदिराला पाहण्यासाठी नक्की या गावी भेट द्या.
Exit mobile version