आपल्या स्वामींचे जीवनाला प्रेरणा देणारे विचार !!!!

कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे.
रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात.

1. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

2. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

3. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

4. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *