दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे माझा समर्था…! ‘स्वामी महाराज मेले, आता तुम्हीच तारा नाहीतर मारा!”

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, स्वामी महाराज हे प्रत्येक भक्ताला संकटातून तारत असतात. भक्ताला कुठल्याही मोठ्या संकटातून सहि सलामत सोडवत असतात. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

दिनांक 25 नोव्हेंबर चा दिवस वेळ दुपारी दोन वाजेची होती. मी व माझे मैत्रीण स्कुटीवर चौकात जात होतो, मी गाडीवर मागे बसले होते. चौक जवळ आला असताना मैत्रिणीला उजवीकडे वळायचे होते. तिने अर्धे दुभाजक पार केले होते तिच्याकडे दोन एक्टिवा तिच्यापुढे दोन एक्टिवा गाड्या असल्यामुळे तिने पण तिची गाडी त्यांच्या मागे काढण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या गाडीच्या मागे 20 टन उसाचा ट्रक होता, आमची गाडी उजवीकडे वळून गेली मात्र ट्रकचा ड्रायव्हर साईड मागत होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *