घरातल्याच 2 बायकांनी संपूर्ण कुटुंबच संपवलं, विदर्भात खळबळ

गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील 5 जणांची त्यांच्याच कुटुंबातील दोन महिलांनी मिळून हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

आधी पती-पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पध्दतीने 20 दिवसांत लागोपाठ 5 जणांच्या रहस्यमय मृत्यूने गडचिरोली जिल्ह्यातील महागाव (बु.) हादरुन गेले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून यामागे थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पुढे आला आहे. अन्न-पाण्यात विष मिसळून या पाचही जणांची पद्धतशीरपणे हत्या केल्याचं आता समोर आले. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीसोबत मिळून हे पाऊल उचललं असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मृतांची नावं
1. शंकर तिरुजी कुंभारे (वय 52 वर्ष)

2 विजया शंकर कुंभारे,

3. कोमल विनोद दहागावकर – विवाहित कन्या (वय 29 वर्ष, रा. गडअहेरी)

4. मावशी आनंदा उराडे (वय 50 वर्ष, रा. चंद्रपूर)

5. मुलगा रोशन शंकर कुंभारे (वय 28 वर्ष)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *