aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही

एक वडील आपल्या मुलीसमोर हात जोडून उभा आहे आणि तिच्याकडे घरी चलण्याची विनवणी करत आहे. जेव्हा मुलगी ऐकत नाही तेव्हा हा बाप आपल्या मुलीच्या पाया पडतो. पण, त्या निष्ठुर मुलीच्या काळजाला पाझर फुटत नाही आणि ती आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी देऊन त्यांना सोडून प्रियकराकडे निघून जाते. लेकीसमोर हताश आणि असहाय झालेल्या वडिलांना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. मुलगी घरी न परतल्याने वृद्ध आई-वडील चिंतेत होते. मुलीला शोधण्यासाठी वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, मुलगी सापडल्यानंतर तिने आई-वडिलांना ओळखण्यासही नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ साबरकांठा जिल्ह्यातील देवधर तालुक्यातील रैया गावाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीला घरी परत आणण्यासाठी आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, मुलीने वडिलांचे काहीही ऐकले आणि ती प्रियकरासह निघून गेली. मुलगी घरी यावी म्हणून वडील तिच्या पाया पडतात. इतकंच नाही तर तिच्या प्रियकरासमोर हात जोडतात. मात्र, मुलगी वडिलांना ओळखण्यासही नकार देते. ही मुलगी काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रियकरासह स्वमर्जीने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

मुलीला घरी आणण्यासाठी आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. वडिलांनी सुरुवातीला पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पळून गेलेल्या जोडप्याला पालकांसमोर हजर केले. पोलिस ठाण्यात वडिलांनी मुलीसमोर हात-पाय जोडले. मात्र, मुलीने ओळखण्यासही नकार दिला. कोणाच्याही डोळ्यात पाणी आणेल असा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघेही प्रौढ असल्याने पोलिसांनाही या प्रकरणात कुठली कारवाई करता आली नसल्याचे समोर आले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *