जून महिन्यात शनि वक्री होताच चार राशींची धाकधूक वाढणार, कशी असेल स्थिती वाचा

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी शनिदेव न्यायदेवतेची भूमिका बजावत असून आपल्या कर्मानुसार चांगली वाईट फळं देतात. ग्रह मंडळात शनिदेव सर्वात मंद गतीने मार्गक्रमण करतात.एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. राशी परिवर्तन करताच साडेसाती आणि अडीचकीचा फेरा सुरु होतो. या दरम्यान शनिची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. यात शनि वक्री अवस्थेत गेल्यास शुभ अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून ही त्यांची स्वरास आहे. शनिदेव जून महिन्यात वक्री अवस्थेत जाणार असून 140 दिवस या स्थितीत असणार आहेत.

शनिदेव 17 जून 2023 रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी वक्री अवस्थेत जातील. 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत शनिदेव या स्थिती असणार आहेत. शनिदेवांच्या या स्थितीचा चार राशीच्या लोकांना जबरदस्त फटका बसणार आहे. चला जाणून घेऊयात शनिदेवांच्या वक्री स्थितीचा कोणत्या राशींना विपरीत परिणाम दिसून येईल.

शनि वक्री स्थितीत या राशींनी जरा सांभाळून
मेष : 17 जून ते 4 नोव्हेंबर या काळात शनिदेव वक्री स्थितीत असणार आहे. त्यामुळे या काळात उतारचढाव दिसून येतील. अडचणींचा डोंगर समोर उभा राहील. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक समस्येला सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी विनाकारण त्रास होईल. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांनी खूपच किचकट समस्येला सामोरं जावं लागेल. व्यवसायात नुकसान होऊ शकतं.

कर्क : या राशीच्या आठव्या स्थानात शनिदेव वक्री होत आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना जबरदस्त फटका बसू शकतो. आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कोणता मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांनी नोकरीत बदल करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा.

तूळ : या राशीच्या जातकांना शनि वक्री होण्याचा फटका बसू शकतो. या काळात मानसिक आणि आर्थिक अडचणीत वाढ होऊ शकतो. या काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही कारणास्तव वाद होऊ शकतात. प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

कुंभ : या राशीत शनिदेव वक्री होत आहेत. त्यामुळे हा काळ या राशीसाठी त्रासदायक असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजी घेणं गरजेचं आहे. अचानक घेतलेला निर्णयामुळे फटका बसू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *