aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत. त्यात वैयक्तिक कुंडलीनुसार जातकांना महादशा आणि अंतर्दशेचा सामना करावा लागतो. शनिदेवत न्यायप्रिय असल्याने जातकाला कशाचीही तमा न बाळगता शासन करतात. त्यामुळे शनि गोचराकडे ज्योतिषांसह जातकांचं बारकाईने लक्ष असतं. आता गोचर कुंडलीनुसार शनिदेव 17 जूनपासू वक्री होत आहेत. याचा प्रभाव राशीचक्रावर दिसून येईल.

शनिदेव 17 जूनपासून कुंभ राशीत वक्री होत आहे. शनिदेवांची वक्री अवस्था 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत राहील. या दरम्यान चार राशीच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे काही ज्योतिषीय उपाय करून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. चला जाणून घेऊयात वक्री काळात कोणत्या राशीच्या जातकांनी सांभाळून राहावं ते…

मेष : या राशीच्या जातकांना 17 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत सांभाळून राहावं लागेल. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात काही मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी जातकांना चढउतार अनुभवायला मिळतील. व्यवसाायत नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात शिवाची आराधना करून दिलासा मिळवता येईल.

कर्क : या राशीचे लोक शनि अडीचकीच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे या काळात गाडी चालवताना काळजी घ्या. लांबचा प्रवास करणं शक्यतो टाळा. नोकरी करणाऱ्या जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. या काळात दुर्गा सप्तशती आणि दुर्गा देवीची उपासना केल्यास दिलासा मिळेल.

तूळ : या राशीच्या जातकांनाही शनिच्या प्रभावातून जावं लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नकारघंटाच ऐकायला मिळेल. त्यामुळे नोकरीत बदल करणं टाळा. आई वडिलांच्या तब्यतेची काळजी घ्याय प्रत्येक दिवशी गणपतीची पूजा करा आणि बुधवारी गणेश आराधना करण्यास विसरू नका.

कुंभ : शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत आहेत. या राशीत शनिदेव जूनपासून वक्री असणार आहेत. त्यामुळे या काळात जातकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. वैवाहिक जीवनातही अडचणी येतील. शिव रुद्राभिषेकासह रोज शिव तांडव स्तोत्राचं पठण करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *