राधा गाण्यावर मुलींनी जांभळे कपडे घालून नाच केला

कमवायचं कशासाठी तर पोटासाठीच ना? मित्रांनो, आपण एवढे काम करतो पैसे मिळवतो, ते फक्त एक पोट भरवण्यासाठी. काही हौशी लोकांना पोट भरण्याबरोबरच आपण जे खातो ते स्वादिष्ट असणंही तेवढंच आवडतं. या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक लांब लांब जाऊन जेवण करतात, पार्ट्या करतात. काही तर ‘जन्म कशासाठी खाण्यासाठीच’ म्हणून खाण्यावर बराच पैसा घालवतात.

नेहमी कुठे काय चांगले भेटते आणि तिथे कधी एकदा जाऊन तो पदार्थ खाऊन येतो असं होतं. तुम्हालाही असे होतच असेल ना? तुमची सुद्धा अशी काही आवडीची ठिकाणे असतील जिथे तुम्हाला जाण्याची सवय किंवा जावे असे वाटत असेल. जसं काही जणांना खायची आवड असते तसंच काहींना जेवण बनवायचीही तेवढीच आवड असते.

आपण बनवलेला पदार्थ दुसऱ्यांनी खाल्ला आणि त्याला आवडून त्याचे समाधान झाले की बनवणाऱ्याचे सार्थक होते. त्याला यातच आनंद मिळतो की, लोक आपण जे बनवतो ते खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी आवर्जुन येतात. अशीच एक गोष्ट आहे नागपूरमधल्या चहाच्या टपरीवाल्याची. सकाळी उत्तम चहा मिळाला की चहाप्रेमी दिवसभर ताजेतवाने असतात.

मित्रांनो याचा चहा एवढा प्रसिद्ध आहे की, लोक लांबून त्याकडे चहा पिण्यासाठी येतात आणि त्यांना चहा पिला की तरतरी येते. हा चहावाला आहे नागपूरमधील रवींद्र नाथ टागोर मार्ग, सदर येथील. या चहावल्याचा चहा जेवढा चविष्ट आणि ताजा असतो तेवढाच हा चहावाला सुद्धा स्टायलिश आहे. या चहावल्याचे नाव डॉली आहे. तुम्हाला त्याला पाहून वाटणारही नाही की तो चहा विकत असेल.

खरंच काय हौस असते काही जणांची! त्याची चहा देण्याची सुद्धा एक विशिष्ठ स्टायल आहे जी ग्राहकांना खूप आवडते. ती तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर समजेलच. सकाळी ६ ते संध्याकाळी ८ पर्यंत ही टपरी चालू असते. तसेच सामान्यांच्या खिशाला परवडेल एवढ्या किमतीत हा चहा मिळतो. ७रु तसेच ५रु मध्ये हा चहा तुम्हाला प्यायला मिळेल.

तसेच आठवड्यातुन सातही दिवस ही टपरी चालू असते तर डॉलीबरोबर त्याचा भाऊसुद्धा टपरीवर असतो. तुम्हीही कधी नागपूरला गेलात तर डॉलीच्या टपरीवरचा हा चहा नक्की प्या. सध्या चहासाठी येवले बंधू, प्रेमाचा चहा, सरपंच चहा, अमृततुल्य असे अनेक दुकान उघडत आहेत परंतु टपरीच्या चहाची चव या दुकानातल्या चहाला कुठे?

पहा व्हिडीओ :

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *