aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

नामवंत पोलीस आणि त्याची बायको दोघे जागीच ठार

इन्स्पेक्टर पती आपल्या पत्नीसह जात असताना एक भीषण अपघात घडला. या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या मागच्या बाजूमध्ये घुसली. यावेळी झालेल्या धडकेत पती-पत्नीला जबर मार बसून त्यांचा जागीच जीव गेला.

कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. सिंदगी येथील सर्कल इन्स्पेक्टर रवी उकुंडा, वय 43 आणि त्यांची पत्नी मधू, वय 40, यांच्यावर या अपघातात काळाने घाला घातला. स्टेशनरीचं सामान घेऊन जाणारा कंटेनर रस्त्यावर थांबला होता. रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला हा कंटेनर हायवेवरच पार्क होता. इन्स्पेक्टर रवी हे स्विफ्ट डिझायर कार चालवत होते. बुधवारी सकाळी ते पत्नीसोबत कारने जात असताना ही दुर्घटना घडली.

कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील असलेले रवी उकुंडा हे कलबुर्गीच्या सिंदगी इथं पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेली सहा वर्ष त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पोलीस दलात पार पाडल्या होत्या. अल्पावधिकच लोकाभिमुख अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली होती. त्यांच्यासोबत झालेल्या या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. रवी हे पत्नीसह स्विफ्ट डिझायर कारमधून जात होते. समोर असलेला कंटेनर रस्त्याच्या कडेला पार्क केलेला आहे, याचा रवी यांना अंदाज आला नाही.

त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी भरधाव वेगाने कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात रवी यांची कार कंटेनरच्या मागील भागात पेचून अडकली गेली. या अपघाताची तीव्रता इतकी जबर होती, की कारमधील दाम्पत्याचा जागीच जीव गेला. कारच्या समोरच्या भागाची काच, बोनेट, समोरची दोन्ही चाकं, याला मोठा फटका बसला होता.

या अपघातानंतरही अपघातग्रस्त कार कंटेनरपासून वेगळी करतानाही प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास केला जातो आहे. कर्नाटक जिल्ह्यातील कोप्पल आणि कलबुर्गी येथील पोलिस सहकाऱ्यांनी एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे दुःख व्यक्त केलंय.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *