aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

गर्लफ्रेंड म्हणली घरी कोण नाही घरी ये, घरी गेला आणि फसला मुलगा

तू ये, आई-बाबा बाहेर गेलेत, असं म्हणत प्रेयसीने फोन करुन प्रियकराला घरी बोलावलं. तो गेलाही. प्रेयसीला खरंतर आपल्या प्रियकराला घड्याळ गिफ्ट करायचं होतं. पण प्रेयसीच्या घरी गेलेल्या या प्रियकराला वेगळंच ‘गिफ्ट‘ मिळालं. घरात चोर घुसलाय, असं समजून प्रेयसीच्या नातलगांनी तिच्या प्रियकराला मारहाण केली. मारहाण इतकी जबर होती की अखेर घायाळ प्रियकराला आरोग्य केंद्रात दाखल करावं लागलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

जखमी प्रियकर डीजे वाजवण्याचं काम करतो. रात्री डीजे वाजवून तो घरी परतत होता. त्यावेळी त्याच्या प्रेयसीने त्याला फोन केला. घरी मम्मी-पप्पा नाहीयत. तू ये आणि तुझं गिफ्ट घेऊन जा, असं तिने प्रियकराला सांगितलं. त्यानंतर प्रियकर तिच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडून आत जावू लागला. नेमक्या याच वेळी प्रेयसीच्या भावाने आणि वडिलांनी तरुणाला घरात जाताना पाहिलं. त्यांना वाटलं कुणीतर चोर घरात शिरतोय.

प्रेयसीच्या भावाने आणि वडिलांनी आरडाओरडा केला. तरुणाला चोपलं. आवाज ऐकून शेजारी-पाजारीही धावले. त्यांनी सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर स्थानिकांनीच तरुणाला आरोग्य केंद्रात दाखल केलं. आता तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण त्याला गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

मारहाणीत घायाळ झालेला तरुण लवकरच बरा होईल, असंही डॉक्टर म्हणाले. हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या बांदा इथं घडला. बांदा येथील बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रारही नोंदवून घेण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *