aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

या मोठ्या अभिनेत्रींचे झाले निधन

‘चीअर्स’ आणि ‘ड्रॉप डेड गॉर्जिअस’ फेम अभिनेत्री किर्स्टी एली यांचं निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. एली यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. एली यांच्या मुलाने निधनाची माहिती देत म्हटलं आहे,”आमच्या आईची कॅन्सरशी झुंझ अपयशी ठरली आहे. कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असताना आम्हाला यासंदर्भात माहिती मिळाली होती.

त्यानंतर लगेचच आम्ही उपचार सुरू केले होते. कॅन्सरचं निदान झाल्याचं आईला कळल्यानंतर ती निराश झाली नाही…ती लढली..डॉक्टरांनीदेखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली”. त्याबद्दल त्यांचे आभार ‘चीअर्स’मधली एमी यांची रेबेका होवे ही भूमिका गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांना एमी आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘चीअर्स’मुळे एली यांना जगभरात लोकप्रियता मिळाली.

त्यानंतर त्यांना ‘वेरोनिकाज क्लोसेट’ आणि ‘लास्ट डॉन’मधील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांनी छोटा पडदादेखील चांगलाच गाजवला आहे. ‘डेविड्स मदर’ या मालिकेतील सॅली गुडसन या भूमिकेसाठी त्यांना दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. किर्स्टी एली यांनी 1982 साली मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली.

1982 मध्ये ‘ट्रॅक 2 : द रॅथ ऑफ खान’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्या अनेक सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिकेत झळकल्या. 19987 साली प्रदर्शित झालेल्या ‘समर स्कूल’ हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने त्यांना लोकप्रियता मिळाली. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *