टायगरला सोडून आता याच्या मागे लागली दिशा

अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून दिशा अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांनी कधी माध्यमांसमोर त्याची कबुली दिली नव्हती. आता टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय.

दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. ॲलेक्झांडर हा दिसायला जितका हँडसम आणि डॅशिंग आहे, तितकाच तो फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. ॲलेक्झांडरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हा दिशाच्याच फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला पहायला मिळतो. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतंय. हे दोघं एकत्र वर्कआऊट करायचे. ॲलेक्झांडर हा जिम ट्रेनरसुद्धा आहे. सर्बियाचा राहणारा ॲलेक्झांडर हा अभिनेतासुद्धा आहे.

सध्या तो मुंबईत राहतोय. ॲलेक्झांडरने शॅमलॉन (Chameleon) या वेब सीरिजमध्ये काम केलंय. अभिनयापेक्षा तो त्याच्या फिटनेससाठी अधिक ओळखला जातो. इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 22 नोव्हेंबर 2022 रोजी अभिनेता कार्तिक आर्यनच्या बर्थडे पार्टीमध्ये दिशा आणि ॲलेक्झांडर एकत्र दिसले. टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा यांच्यासोबतही ॲलेक्झांडरची चांगली मैत्री आहे. इतकंच नव्हे तर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकशीही त्याची खास मैत्री आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *