NMJOKE

ट्रकच्या धडकेमुळे चिमुकल्यासोबत आई वडील देखील जग सोडून गेले

पाटस – कुसेगाव ( ता. दौंड ) रस्त्यावर भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेमुळे पाटस परिसरावर शोककळा पसरली आहे. संतोष साबळे, रोहिणी संतोष साबळे, गुरु संतोष साबळे ( वय ५, तिघेही रा. पाटस ता. दौंड ) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसेगाव येथून साबळे कुटुंबीय दुचाकीवरून येत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की अपघात झाल्यावर मोठा आवाज झाला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले तसेच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांचे पोलिस आले.

अपघातग्रस्त ट्रकचा चालक पळून गेला. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले होते तर पाच वर्षांच्या गुरु या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.”, “articleBody”:”पाटस ( पुणे ) : पाटस – कुसेगाव ( ता. दौंड ) रस्त्यावर भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला.

या घटनेमुळे पाटस परिसरावर शोककळा पसरली आहे. संतोष साबळे, रोहिणी संतोष साबळे, गुरु संतोष साबळे ( वय ५, तिघेही रा. पाटस ता. दौंड ) अशी मृतांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसेगाव येथून साबळे कुटुंबीय दुचाकीवरून येत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की अपघात झाल्यावर मोठा आवाज झाला.

यावेळी परिसरातील ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले तसेच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांचे पोलिस आले.अपघातग्रस्त ट्रकचा चालक पळून गेला. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले होते तर पाच वर्षांच्या गुरु या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

Exit mobile version