कोणत्याच मराठी कलाकारांकडे नाही इतकी महागडी कार, स्वप्नील जोशीने घेतली

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी कायमच मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चेत असतो. आपल्या चित्रपटामुळे स्वप्नील जोशी नेहमी प्रकाशझोतात येतच असतो. अलीकडेच त्याने पून्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वप्नील जोशी चर्चेत आला आहे. तसे तर मागील जवळपास दोन दशकाहून अधिक काळापासून स्वप्निल जोशी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याने केवळ मराठीच नाही तर हिंदीतून सृष्टीत देखील आपली खास जागा निर्माण केली आहे.

अनेक हिंदी मालिकांमध्ये स्वप्निल जोशी ने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळेच त्याचा मोठा चाहता वर्ग पहायला मिळतो. मराठी सिने सृष्टीतील रोमान्स किंग म्हणून स्वप्निल जोशीला ओळखलं जातं. आता त्याच्या रोमान्स ची जादू छोट्या पडद्यावरती देखील पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत स्वप्निल जोशीचा खास रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेने सगळीकडे जोरदार चर्चा रंगवली आहे असे कळून येते.

प्रदर्शित होत असलेल्या मालिकेमध्ये स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांचा इंटिमेट सीन दाखवण्यात आला आहे. या सीन वरून सोशल मीडिया वरती चांगली चर्चा पाहायला मिळाली. तर आता पुन्हा एकदा स्वप्नील जोशी एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी हा व्हिडिओ त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित आहे. त्यांनी घेतलेल्या गाडीचा व्हिडिओ नुकताच इंस्टाग्राम वरती वायरल झाला आहे. साधारण वर्षभरापूर्वी स्वप्नीलने एक महागडी गाडी खरेदी केली. त्याने ‘आयपेस जग्वार’ कार खरेदी केली होती.

स्वप्निलची ही कार इलेक्ट्रिक आहे. आता त्याच्या या कारला एक वर्ष पूर्ण झाल आहे. त्यामुळेच व्हिडिओ शेअर करत स्वप्निल ने आपल्या कारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याचं आपल्या कार वर किती प्रेम आहे, हे देखील त्याच्या पोस्टवरून समोर येत आहे. या कारची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे. महागडी आणि खास कार खरेदी करणे, हे त्याच स्वप्न होतं. साधारण वर्षभरापूर्वीच त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं.

आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-बाबा आणि पत्नी लीना हिने हातभार लावला, याबद्दल त्याने त्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या स्वप्नातील या कारने त्याला खूप चांगला प्रवास आणि सुखी क्षण दिले आहेत. आई बाबा आणि पत्नी लीना सोबत त्याने या कारमधून अनेक वेळा सुट्ट्यांना जाण्याचा आनंद घेतला आहे. त्यामुळे आता ही कार अधिकच खास बनली आहे, अशी भावना स्वप्निल ने या पोस्टमधून व्यक्त केली आहे असे तुम्हाला पोस्ट वरून समजले असेलच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *