भारतीय धावपटू दुती चंदनं हिने केले मुलीशीच लग्न

भारतीय अॅथलीट दुती चंदनं आपण समलैंगिक असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. ती तिची मैत्रिण मोनालिसासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमीच दोघींचे फोटोही शेअर करत असते. आता दुती चंद आणि मोनालिसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून या दोघींनी लग्न केलं की काय? अशी चर्चा सुरु आहे. मात्र दोघींच्या लग्नाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दुती चंदची बहीण अंजना चंद हिचे नुकतेच लग्न झाले. यावेळी दुती तिची समलैंगिक पार्टनर मोनालिसासोबत उपस्थित होती. दुतीने तिच्या बहिणीच्या लग्नानंतर आपल्या पार्टनरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिनं हा फोटो शेअर केल्यानंतर दुतीने मोनालिसासोबत लग्न केलं की काय अशी चर्चा सुरु झाली आहे, मात्र तिनं अद्याप लग्न केलेलं नाही.

दुतीने आपल्या बहिणीच्या लग्नानंतर आपल्या पार्टनरसोबतचे फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने ट्विटरवर लिहिले, कालही तुझ्यावर प्रेम केले, आजही आहे आणि भविष्यातही प्रेम सदैव असेल.” दुतीच्या या फोटोला हजारो लोकांनी ट्विटरवर लाईक केले आहे. दुतीचा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्सही गोंधळात पडले आहेत आणि तिला लग्नासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. इंस्टाग्रामवरही दुतीच्या फोटोला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.

2014 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान दुती चंदचे हार्मोन्स वाढल्याची चर्चा होती. यानंतर तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच कारणामुळे ती 2014 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र, त्यानंतर तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली.

2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दुतीने भारतासाठी दोन रौप्य पदके जिंकली होती. आशियाई चॅम्पियनशिपमध्येही तिने कांस्यपदक पटकावले होते. भारतीय धावपटू असलेल्या दुती चंद हिने आपण समलैंगिक असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. ओदिशात आपल्याच गावात राहणाऱ्या मोनालिसासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दुतीने दिली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *