८ वर्ष्याच्या चिमुकलीला मारून शेतात जाळले

घराशेजारील परीसरात खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात बुधवारी सकाळी मृतदेहच आढळला. साकोली तालुक्यातील पापडा येथेमील बालिका सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. पोलीस घटनास्थली पोहचले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील श्रध्दा किशोर सिडाम वय (८) असे मृत बालिकेचे नाव आहे.

ती तिसऱ्या वर्गात शिकते. सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र घरी आली नाही. उशिरापर्यंत श्रद्धा घरी न परतल्याने घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले. शोधमोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. मात्र, मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास नामदेव लांजेवार यांच्या शेतात तणसाचा ढिगारा पेटत असल्याचे रूपचंद झोडे यांना दिसले. त्यांनी गावात माहिती दिली. गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली असता, तणसाच्या ढिगाऱ्यात पोत्यात भरून जळलेल्या अवस्थेत श्रद्धाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला. श्वानाने श्रद्धाच्या घराच्या बाजूची दोन घरे सोडून एका घरासमोर थांबत असल्याने संशयाला जागा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या प्रकरणी भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी लवकरच जेरबंद होतीलश्रद्धा सिडाम हिला प्रथम ठार मारले आणि नंतर तिला जाळण्यात आले. एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता असून, लवकरच आरोपी गजाआड होतील. प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

तणसाच्या ढिगाऱ्यात बुधवारी सकाळी मृतदेहच आढळला. साकोली तालुक्यातील पापडा येथेमील बालिका सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. पोलीस घटनास्थली पोहचले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील श्रध्दा किशोर सिडाम वय (८) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती तिसऱ्या वर्गात शिकते.

सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र घरी आली नाही. उशिरापर्यंत श्रद्धा घरी न परतल्याने घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले. शोधमोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *