१० दिवसांचे लेकरू अन जवान गेला जग सोडून

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकीवाटमधील जवान शीतल कोळी (वय 29) यांचे अपघाती निधन झाले. लेकराचे तोंड बघून घरी येत असतानाच काळाने घाला घातल्याने संपूर्ण शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकीवाटमधील जवान शीतल कोळी (वय 29) (jawan shital koli) यांचे अपघाती निधन झाले.

अवघ्या 10 दिवसांपूर्वी जन्मलेल्या लेकराचे तोंड बघून घरी येत असतानाच काळाने घाला घातल्याने संपूर्ण शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर लष्करी इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, भाऊ, विवाहित बहीण, दोन वर्षाचा व 10 दिवसाचा अशी 2 मुले आहेत. कुरुंदवाड मजरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलची धडक होऊन गंभीर जखमी झाले.

उपचारादम्यान सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अकिवाट येथे आणण्यात आले. बेळगावी येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन लष्करी इतमामात अंत्यविधी करण्यात आले. अकीवाटमधील 15 मराठा बटालियनचे जवान शीतल कल्लाप्पा कोळी यांना अवघ्या 10 दिवसांपूर्वीच मुलगा झाला आहे. ते 18 नोव्हेंबरला अकिवाटला आले होते.

लेकराला पाहण्यासाठी ते सांगली जिल्ह्यातील माळवाडी-सावळवाडीत सासरवाडीत गेले होते. मात्र, गावी परतत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. यामुळे कुटुंब शोकसागारात बुडाले. जवान शीतल कोळी 8 वर्षापासून सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते.15 मराठा बटालियनमध्ये ते ढाना मध्य प्रदेशात देशसेवा बजावत होते. त्यांना एक दोन वर्षांचा मुलगा आहे, त्यांना दुसऱ्यांदा पुत्ररत्न प्राप्त झाल्याने 18 तारखेला आपल्या मूळ गावी अकिवाटमध्ये आले होते. शुक्रवारी दिवसभर ते पत्नी व मुलासमवेत वेळ घालवला.

शनिवारी कर्तव्यावर हजर होण्यासाठी शुक्रवारी मिरज रेल्वे स्टेशन येथून रेल्वेचे तिकीट बुकिंग करून अकीवाटकडे येत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नायब तहसीलदार योगेश जमदाडे, सपोनि बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सरपंच विशाल चौगुले आदी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने अकिवाट व परिरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *