तीन मोठ्या कलाकारांसोबत रात्र काढणारा मुलगा दिसला सचिन तेंडुलकरच्या मुलीसोबत

आजच्या इंटरनेटच्या काळात कोणाचेच आयुष्य प्रायव्हेट राहील नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच जण एकमेकांच्या संपर्कात असतात. सोशल मीडिया वरती सेलिब्रेटी आणि त्यांच्या मुलांचा अर्थातच स्टार किड्सचा देखील खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. हे स्टार किड्स देखील मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या चांगलाच फायदा घेतात.

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घडामोडी देखील ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. सोशल मीडिया वरती कायमच स्टार किड्सच्या पोस्टची चर्चा रंगल्याचं बघायला मिळतं. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील सोशल मीडिया वरती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडिया वरती ती आपले अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते. काहीच दिवसांपूर्वी साराने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

तिचा इतका ग्लॅमरस अवतार बघून सर्वजण तिच्यावर फिदा झाले आहेत. मात्र सारा प्रसिद्ध क्रिकेटपटू शुभमन गिल वर फिदा झाल्याचं बोललं जात होतं. त्या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली अनेक वेळा त्या दोघांना पार्टी करताना बघितलं गेलं आहे. त्यामुळे सारा आणि शुभमन एकमेकांच्या प्रेमात असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यातच सोशल मीडिया वरती दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं. आणि त्यामुळे कदाचित त्यांचे ब्रेकअप झालं असा कयास अनेक जण लावत आहेत.

सारा अली खानच्या रूपात शुभमनला एक नवीन खास मैत्रीण मिळाली आहे. अलीकडेच झालेल्या मुलाखतीमध्ये शुभमन ने सारा अली खानला डेट करत असल्याचे संकेत देऊन टाकले आहेत. तर दुसरीकडे सारा तेंडुलकर देखील एका खास व्यक्ती सोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीदरम्यानचे काही फोटोज सोशल मीडिया वरती वायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये सारा तेंडुलकर सोबत असलेल्या मुलावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. हा मिस्टरी बॉय नक्की कोण याबद्दल सध्या सोशल मीडिया वरती चर्चा बघायला मिळत आहे. सारा सोबत असलेली त्याची जवळीक बघता या मुलाबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

शिक्षणासोबतच सारा मॉडलिंग क्षेत्रातही सक्रिय झाली आहे. काही प्रसिद्ध ब्रँड साठी साराने जाहिराती देखील शूट केले आहेत. आपल्या मॉडलिंगच्या काही फोटोज ने साराने सोशल मीडिया वरती अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आणि आता पुन्हा एकदा ती पार्टी दरम्यानच्या या फोटोमुळे चर्चेत आली आहे. सारा सोबत फोटोमध्ये दिसणारा मिस्ट्री बॉय ओरि या नावाने प्रसिद्ध आहे.

यापूर्वी ओरीचे काही फोटोज यापूर्वी अजय देवगन ची मुलगी न्यासा आणि यांनी कपूर सोबत देखील वायरल झाले आहेत. जानवी कपूर सोबत त्याने अनेक वेळा पार्टी मधले फोटोज शेअर केले आहेत. आणि आता सारा तेंडुलकर सोबत त्याचे फोटोज समोर आले आहेत. त्याचे पूर्ण नाव ओरहान अवात्रामणी असं आहे. बॉलीवूड स्टार किड्स मध्ये ओरहान चांगलाच प्रसिद्ध आहे. खास करून स्टार किड्सच्या मुलींसोबत ओरहान ची खास मैत्री आहे. दरम्यान, बी- टाऊनचा न्यू हार्ट-थ्रोब म्हणून ओरहानला ओळखलं जातं आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *