या मराठी मधील मोठ्या अभिनेत्याचं झालं निधन

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते.

वयाच्या 77 वर्षी विक्रम गोखले यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आलं आहे. यावेळी अभिनेत्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या आठवणीदेखील शेअर केल्या. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नटसम्राट चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगली भूमिका बजावली. माहेरची साडी या चित्रपटात देखील त्यांची भूमिका उत्तम होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी हिंदी सिनेमांमध्ये काम केले. असा नट लाभणे नाही अशी उपमा त्यांना देणे योग्य ठरेल. लाखो मराठी लोकांच्या मनावर राज्य करणारा उत्तम कलाकार आज आपल्यात नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *