“बायकोने उघड केले अभिनेत्याचे सिक्रेट…..”अग्गं बाई सोशल मीडियावर असं नसतं करायचं!”

खरयं! सेलिब्रिटी कलाकारांच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी ऐकण्यासाठी चाहत्यांचे कान तरसलेले असतात हे काही आता लपून राहिलेलं नाही. कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी त्यांच्या सोशलमीडिया पेजवरही रोज एकतरी भटकंती करत असतात. पण अभिनेता विपुल साळुंखे याच्या चाहत्यांचं काम त्याची बायको नम्रतानेच सोप्पं केलंय.

विपुल सध्या एक भन्नाट गोष्ट करतोय जी अजून तरी त्याच्या चाहत्यांना माहिती नव्हती, पण हे सिक्रेट त्याची नम्रताने सोशलमीडियावर पोस्ट करत सांगून टाकलय. यावर अर्थातच विपुलची कमेंटही खूप बोलकी आहे. असं कोणतं सिक्रेट आहे जे सांगितल्यामुळे विपुलने बायकोला पाप लागेल अशी प्रतिक्रिया दिलीय. विपुल साळुंखे सध्या मुरांबा मालिकेतील आनंद मुकादम या भूमिकेमुळे लोकप्रिय झाला आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

सोशलमीडियावर ॲक्टीव्ह असलेल्या कलाकारांपैकीच विपुल आहे.अभिनेता विपुल साळुंके हा नेहमी त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. अनेकदा सामाजिक विषयावरील त्याच्या पोस्ट आणि कमेंटही चर्चेत असतात. दोन महिन्यांपूर्वी विपुलच्या आजीचे निधन झाले तेव्हा त्याने आजीमुळे गाव संपलं ही पोस्ट शेअर केली होती. त्याची ही भावुक पोस्ट खूपच व्हायरल झाली होती.

समाजातील काही गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठीही विपुल सोशलमीडियाचा चांगला वापर करतो. थोडक्यात काय तर सोशलमीडियावर विपुल त्याच्या चाहत्यांना खूप काही जाणून घेण्यासाठी माहिती देतच असतो. पण सध्या मात्र विपुलने त्याच्याबाबतीतील एक गोष्ट लपवून ठेवली होती जी त्याच्या बायकोने नम्रतानेच सगळ्यांना सांगितली आहे. खरंतर नम्रताने तिच्या फेसबुक पेजवर विपुलची करामत सांगितली आहे आणि ती पोस्ट विपुलने शेअर करत त्यावर आपली कमेंट दिली आहे.

या पोस्टमध्ये नम्रताने असं लिहिलं आहे की, एखादी गोष्ट मनात ठरवली तर त्यासाठी कसे मन लावून प्रयत्न करावे हे माझ्या नवऱ्याकडूनक शिकावे. गेले काही महिने तो हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यासाठी त्याने एक नवीन उपक्रम चालू केला आहे. त्यासाठी रिअल इस्टेट, लोन्स, क्रेडिट कार्ड, फोन बिल यासाठी कुणाचेही फोन आले तर तो कमीत कमी २ ते ३ मिनिटं तरी अस्खलित हिंदी भाषेतून त्यांच्याशी जबरदस्ती… माफ करा, जबरदस्त संभाषण करून भाषेचा सराव करतो.

नम्रताने माझा नवरा माझा अभिमान असा हॅशटॅगही जोडलाय. या पोस्टमधील मेख हुशार नेटकऱ्यांना बरोब्बर समजली आहे.नम्रताची ही पोस्ट शेअर करत विपुलने दिलेली कमेंटही चर्चत आहे. तो म्हणतोय की, हे असं नवऱ्याचं ट्रेंड सिक्रेट रिव्हिल नसतं करायचं, पाप लागतं. सध्या विपुलच्या आयुष्यातील हा किस्सा चाहत्यांचं भरपूऱ् मनोरंजन करत आहे. खरतर अनेकांना चांगलं इंग्रजी आणि हिंदी बोलता यावं असं वाटतं पण समोर कोणाशी बोलायची हिम्मत होत नाही.

त्यामुळे फोनवर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी इंग्रजीत बोलले तर आपला सर्व तर होतोच शिवाय स काही चुकलंच तर समोरची व्यक्ती आपल्याला ओळखत नसल्याने अपमान झाल्यासारखं देखील वाटत नाही. अनेक स्पोकन इंग्लिश क्लास मध्ये देखील अश्या प्रकारची ट्रिक वापरण्याचा सल्ला दिला जातो पण आपण मात्र असं वागत नाही कारण त्याला मनाची तयारी आणि अंगी जिद्द बाळगावी लागते. आता अनेकजण म्हणतील कि ह्या अभिनेत्याला मराठीचा अभिमान नाही का? तो तर नक्कीच आहे पण इतर भाषा देखील चांगल्या अवगत झाल्या तर त्यात आपलाच फायदा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *