“‘धर्मवीर” मधील एकनाथ शिंदेची भुमिका करणारा हा अभिनेता ओळखीचा वाटतोय? त्याने गाजवलेला अजुन एक चित्रपट…”

“ठाणे” शहर आणि जिल्ह्याला जगात नावलौकीक मिळवुन देणारे आणि शिवसेनेचा अभेद्य गड बनविणारे धर्मवीर आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार करणे. गोर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारं ते एक थोर व्यक्तिमत्त्व होतं.

माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसं त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. ‘धर्मवीर’ या चित्रपटातून त्यांच्या जीवनाचा हाच प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक याने साकारली आहे. काल चित्रपटाच्या प्रमोशदरम्यान एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या गेटपमध्ये पाहून त्याच्या पाया पडले. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचं नातंच तितकं खास राहीलं आहे.

एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे पण त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास होते. कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर एकनाथ शिंदे ठाण्यात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते . त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्यातील जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होते. एकदा ठाण्यात साखरेचा तुटवडा जाणवू लागला त्यावेळी साखर आणण्याची जबाबदारी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली होती.

ही जबाबदारी सुखरूप पाडली असल्याने एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचे मन जिंकून घेतले होते. इथूनच त्यांच्या जवळची खास व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे नावारूपाला आले. राजकारणातला एकनिष्ठ माणूस बनण्याचा त्यांना मान मिळाला. एकनाथ शिंदे यांची दोन्ही मुलं धरणात बुडाली त्यावेळी त्यांना दिघे साहेबांनी मोठा आधार दिला होता. यावेळी दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्या बापाची जागा घेतली होती.

दिघे साहेबांचे निधन झाले त्यावेळी एकनाथ शिंदे पुरते खचून गेले होते मात्र दिघे साहेबांच्या पश्चात शिवसेनेचा वारसा आता आपल्यालाच पुढे न्यायचाय याची जाणीव त्यांना झाली.आनंद दिघे यांनीच एकनाथ शिंदे यांना राजकारणात आणले त्याचमुळे काल चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या गेटपमध्ये स्टेजवर आले त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाया पडले. धर्मवीर या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा दाखवण्यात येणार आहे.

अभिनेता क्षितिश दाते एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच एकनाथ शिंदे यांच्या गेटपमधला क्षितिशचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून हा अभिनेता कोण ? अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. क्षितिश दाते याने मुळशी पॅटर्न चित्रपटात गण्याची भूमिका गाजवली होती. मालिका, नाटक तसेच चित्रपटातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धर्मवीर चित्रपटात त्याला एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. ही भूमिका माझ्यासाठी तितकीच खास आहे असे क्षितिश म्हणतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *