“‘गदर’मधील हा बाल कलाकार झालाय गोंडस तरुण, पाहून नक्कीच आश्चर्य होईन!

मनोरंजन करणार्या बाॅलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काही बाल कलाकारांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. आज आपण अशाच सुपरहिट चित्रपटाच्या बाल अभिनेत्याबद्दल जाणणार आहोत ज्याला बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. “गदर एक प्रेम कथा” या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच प्रिसिद्धी मिळवली.

भारत-पाक विभाजनादरम्यान हा चित्रपट खऱ्या प्रेमकथेवर आधारित होता. आणि या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या लहान मुलाची भूमिका साकारणारा चरणजित आता तरुण झाला आहे. चरणजीतने निभावलेली गदरमधील बालकलाकाराची भुमिका सर्वांच्याच पसंतीस ऊतरली होती. बाल चरणजीतची आईपासुन झालेली ताटातुट प्रेक्षकांनाही दुखावुन गेली होती. पुढे आपल्या वडीलांसोबतचा जलमार्गै पाकिस्तान प्रवास व त्याहुन जास्त चित्तथरारक असा परतीचा प्रवास व मेलोड्रामा आजही सर्वांच्या आठवणींत सामावलेला आहे.

चरणजीतची भूमिका साकारणारा हा चिमुकला म्हणजे उत्कर्ष शर्मा! हा स्वत: ‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल प्रमाणेच या चित्रपटात चरणजितची आक्रमक भूमिका साकारणार्‍या उत्कर्ष शर्माच्या अभिनयाचेही लोकांनी खूप कौतुक केले.
उत्कर्ष शर्मा अभिनयाबरोबरच अभ्यासामध्येही चांगला आहे.

उत्कर्षने अमेरिकन संस्थेतून चित्रपट निर्मितीचा अभ्यास केला आहे आणि दा ली स्ट्रासबर्ग थिएटर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ट्रेनिंग घेतली आहे.अनिल पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे परत येत आहे आणि यावेळी तो ‘जीनियस’ नावाचा चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटापासून तो आपला मुलगा उत्कर्षला बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून लाँच करण्याची तयारी करत आहे. बाॅलिवूडमधील ह्या हरहुन्नरी पितापुत्रास भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *