बॉलिवूडच्या चमचमत्या युगात रोज काहीतरी घटना घडत असतात. तुम्ही देखील आजवर अनेक चकित करणाऱ्या घटना पाहिल्या असतील. आज देखील एक नवीन बातमी समोर आली आहे. आलीय भट्ट ला लहान मुलगी म्हणून सतत संबोधले जात होते. तिचे अनेक ट्रोल्स देखील तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र आज हीच लहान मुलगी आई बनली आहे.
होय आलिया भट्ट चे रणबीर कपूर सोबत काही महिन्यांपूर्वी २०२२ मध्ये लग्न झाले होते. त्यांचा जोडा देखील खूप शोभून दिसतो. आज दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलीया आणि रणबीर आई वडील बनले आहेत. रिलायन्स रुग्णालयामध्ये आलिया ला सकाळी प्रसूती साठी दाखल करण्यात आलं होत. आलिया आता भट्ट राहिली नसून ती कपूर कुटुंबाची झाली आहे.
कपूर परिवारामध्ये आलियाने आनंदाची बातमी दिली आणि सर्वाना खुश केले. मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकलेल्या आलिया ने सोशल मीडियावर देखील पोस्ट करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. एक शुभेच्छा पत्र आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अजून देखील शुभेच्छांचा वर्ष्याव सुरु आहे.
प्रसूती नंतर कपूर कुटुंब रुग्णालयात पोहचलं आणि त्यांनी देखील आलिया आणि रणबीर ला खूप शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर आलिया चे लाखो चाहते आहेत. रणबीर चे देखील चाहते कमी नाहीत. दोघेही आईबाबा झाले असल्याने त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहते देखील खूप खुश आहेत. आलिया आणि रणबीर ला आपल्या न्यूज पोर्टल कडून खूप खूप शुभेच्छा.