NMJOKE

सुप्रसिध्द अभिनेते मोहन जोशी ह्यांची पत्नी कोण आहे? काय करते काम?

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेते मोहन जोशी यशच्या आजोबांची भूमिका साकारत आहेत. आपल्या नातवाने लग्न करून संसार थाटावा म्हणून ते यशच्या मागे लागलेले असतात. मोहन जोशी यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला तो बालवयापासूनच. ६ वी इयत्तेत शिकत असताना त्यांनी ‘टूणटूण नगरी खणखण राजा’ या नाटकात काम केलं.

पुरुषोत्तम करंडक, महाराष्ट्र कामगार कल्याण स्पर्धा, औद्योगिक ललित कलामंडळ अशा स्पर्धातून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. कॉमर्स विषयातून पदवी घेतल्यावर त्यांनी पुण्यातील किर्लोस्कर कंपनीत नोकरी केली मात्र नाटकात काम करण्यासाठी त्यांना वारंवार सुट्ट्या घ्याव्या लागत त्यामुळे त्यांना सारखं खोटं बोलावं लागत होतं.शेवटी अभिनय की नोकरी या दोन्ही पैकी एक गोष्ट निवडावी म्हणून हातच्या नोकरीला त्यांनी राम राम ठोकला.

दरम्यान स्वतःच्या ट्रकवर त्यांनी ड्रायव्हरचे कामदेखील केले. अभिनयाच्या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली. ‘कुर्यात सदा टिंगलम’ हे त्यांनी अभिनित केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं. भुताचा भाऊ’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. या चित्रपटातून त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. पुढे अशाच धाटणीच्या भूमिकांनी त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत नाव कमावले.

देऊळ बंद चित्रपटाने त्यांच्या खलनायकी ढंगाच्या भूमिकेला फाटा दिला पुष्पक विमान चित्रपट असो वा अग्गबाई सुनबाई आणि अग्गबाई सासूबाई मालिका त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. माझी तुझी रेशीमगाठ मधील त्यांनी साकारलेले खट्याळ आजोबा आणि तितकेच जबाबदार सासरे आपल्या अभिनयाने चोख बजावलेले पाहायला मिळतात. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी आजवर ४५ हुन अधिक नाटक, ३५ हिंदी- मराठी मालिका, २२० मराठी चित्रपट आणि ३४५ हिंदी चित्रपट अभिनित केले आहेत.

संगीत नाट्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते. आपल्या आयुष्याच्या या यशस्वी प्रवासात त्यांना त्यांची पत्नी ज्योती जोशी यांची खंबीर साथ मिळाली. ज्योती जोशी या निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना गौरी आणि नंदन ही दोन अपत्ये आहेत. मोहन जोशी यांचा मुलगा नंदन अभिनय क्षेत्रात न येता तो एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेला पाहायला मिळतो.

नंदन हा इंटेरिअर डिझायनर असून रचना संसद आर्किटेक्ट स्कुलमधून त्याचे प्रशिक्षण त्याने घेतले आहे. तर मुलगी गौरी हिचे झाले असून सध्या ती बंगलोर येथे आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाली आहे. एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा अभिनय क्षेत्रात न येता त्याने आपलं आवडतं करियर निवडलं हे विशेष. भविष्यासाठी शुभेच्छा!

Exit mobile version