बॉलिवुडची ही प्रसिध्द अभिनेत्री लग्नाआधी गरोदर? का गडबडीत लपवले पोट?

बाॅलीवुडमध्ये नात्यांचा गुंता आणि कधी कशी कुठे कुणाची कुणाशी नाळ जुळेनसांगता येत नाही. सत्तरीच्या दशकापासुन ते आजपर्यंत नाते अगदी पुढे गेल्यावर म्हणजे गरोदरपण आल्यावर अथवा लग्नाअधीही मूल झाल्याच्या वा त्यामूळेचं लग्न केल्याच्या घटना भरपुर आहेत. बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात झालेल्या सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांनंतर यापैकी बऱ्याच जोड्यांनी त्यांच्या नात्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली.

मुद्दा असा, की या बातमीनंतर सेलिब्रिटी जोड्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला खरा. पण, सोबतच काही प्रश्नही उपस्थित झाले. लग्नाआधीच या जोडीच्या नात्यात बाळाच्या आगमनाची माहिती मिळालेली का, हाच तो प्रश्न. आता याच प्रश्नांचा भडीमार केला जातोय अभिनेत्री रिचा चड्ढावर. काही दिवसांपूर्वीच रिचानं प्रियकर, अभिनेता अली फजलशी लग्नगाठ बांधली.

फुकरे चित्रपटातुन ह्या दोघांचा सशक्त अभिनय समिक्षकांसह प्रेक्षकांनीही वाखाणलेला. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात व लग्नात झाले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर या जोडीनं जंगी पार्टीही दिली. यामध्ये कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील मित्रपरिवारानं हजेरी लावली होती. रिचा आणि अलिच्या लग्नाच्या चर्चा अजून जुन्याही झाल्या नाहीत तोच एका व्हिडीओनं सर्वांच्याच नजरा वळवल्या.

नुकत्याचं एका व्हायरल व्हिडीओ मध्ये रिचा वारंवार साडीच्या पदरानं तिचं पोट झाकताना दिसत आहे. मध्येच ती अलिचा हातही सोडते, पण पदरानं पोट झाकणं काही बंद होत नाही. बस… मग काय? सोशल मीडियावर रिचाच्याच्या गरोदरपणाच्या चर्चांना वाव देण्यासाठी तिची ही एक कृतीही पुरेशी ठरतेय. रिचा पोट का लपवतेय?

असंही नाही की तिनं बराच बोल्ड ड्रेस घातला आहे. चांगल्या साडीमध्ये तिच्यावर अशी काय वेळ यावी, की पदर वारंवार पोटावर घ्यायला लागतोय असाच प्रश्न चाहत्यांना पडला. मुद्दा असा, की रिचासुद्धा आलियाप्रमाणेच लग्नाआधीच गरोदर होती का? अशीच शंका आता बळावू लागली आहे. चाहत्यांना लवकरचं ह्याबाबत सत्य कळेनचं!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *