नवा गडी नवं राज्य’मधील हे कलाकार आहेत खऱ्या आयुष्यात नवरा बायको

दुरदर्शनवरील मालिका विश्वात नानाविध वाहिन्या सतत नवनव्या संकल्पना घेऊन नवनवीन मालिका प्रदर्शित करत असतात. झी मराठी वाहिनेने दीर्घ काळापासून म्हणजेच सुरवातीला मराठीतील पहिली मेगास्टार मालिका “आभाळमाया” देऊन आजतागायत एकापेक्षा एक भारी मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका चाहतावर्ग कमावत आहे.

काही प्रमाणात ही मालिका ट्रोलही होते. मात्र अल्पावधीत चर्चेत आलेली मालिका असं नक्कीच ‘नवा गडी नवं राज्य’बाबत आपण म्हणू शकतो. या मालिकेने अलिकडेच झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट मालिका’ हा पुरस्कारही पटकावला. या मालिकेतील रमा, आनंदी, चिंगी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

पण, तुम्हाला माहीत आहे का की या मालिकेत एक खऱ्या आयुष्यातील जोडपेही काम करते आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ मध्ये नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यातही नवरा बायको आहेत. ही जोडी म्हणजे दुसरी-तिसरी कुणी नसून रमाचे आई-वडील. हे जोडपं दीर्घकाळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता या मालिकेद्वारे ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

‘नवा गडी नवं राज्य’मध्ये रमाच्या आई-वडिलांची भूमिका मृणाल चेंबूरकर आणि पंकज चेंबूरकर साकारत आहेत. या दोन्ही कलाकारांनी विविध मालिकांमधून याआधी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते नाट्यक्षेत्राशीही जोडलेले आहे. तर नवोदित कलाकारांसाठीही त्यांने अभिनयाचे वर्कशॉप आयोजित केले आहे. लहान मुलांसाठीही या जोडप्याने वर्कशॉप आयोजित केले आहेत. सोशल मीडियावर याविषयी पोस्ट करण्यात आली होती. मालिकेस शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *