“महागुरु सचिन पिळगावकर करणार होते ह्या बाॅलिवुड तारकेशी लग्न… आता जगतेय हलाखीचे जीवन!”

एका अशा अभिनेत्रीची ओळख करून द्यायची आहे जिने आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच हालअपेष्टा सहन केल्या आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे “सारिका ठाकूर”. ३ जून १९६२ रोजी दिल्ली येथील मराठी- हिमाचली कुटुंबात सारिकाचा जन्म झाला. सारिका लहाण असतानाच वडील घर सोडून कुठेतरी निघून गेले. घरची परिस्थिती हालाकीची झाल्याने तिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका मिळाली. मुलगी असूनही “मास्टर सूरज” या मुलाची भूमिका तिने साकारली. छोटी बहू, बडे दिलवाला, अकलमंद, रझिया सुल्तान अशा अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून एका आघाडीच्या नाईकांमध्ये आपले नाव कोरले. चित्रपटात काम करून मिळालेला पैसा तिची आई कमल ठाकूर कडे सुपूर्त करत. एवढेच नाही तर अगदी प्रॉपर्टी, घरदार सर्व आईच्याच नावे तिने करून दिले होते.

सारिकाने सचिन पिळगावकर ह्यांच्यासोबत गीत गाता चल, जान ए बहार, मधू मालती, रक्षाबंधन, जाये तो जाये कहा सारख्या तब्बल १२ चित्रपटात एकत्रित काम केले. चित्रपटातील त्यांच्या जोडीला विशेष पसंती देखील मिळाली. ह्याचाच परिणाम म्हणून त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. दोघेही एकमेकांना पसंत असताना लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले. परंतु सारिकाच्या आईला हे लग्न मान्य नव्हते.

लग्नानंतर सारिकाचे करिअर संपुष्टात येण्याच्या भीतीने त्यांनी या लग्नाला विरोध दर्शवला. यानंतर सारिका मनातून पूर्णपणे खचून गेली. पुढे काही वर्षाने सारिका मुंबई सोडून मद्रासला निघून गेली. तिथे आपला जम बसवत असताना दाक्षिणात्य सुपरस्टार “कमल हसन ” सोबत तिची मैत्री झाली.या मैत्रीचे प्रेमात आणि पुढे लग्नात रूपांतर झाले. १९८८ साली सारिका आणि कमल हसन लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाआधीच सारिकाने मुलगी “श्रुती ” हिला जन्म दिला असल्याचे सांगितले जाते.

श्रुती हसन दाक्षिणात्य चित्रपटातील टॉपची अभिनेत्री म्हणून नाव कमवत आहे. श्रुती आणि अक्षरा ह्यांच्या जन्मानंतरही सारिकाने चित्रपट क्षेत्रात आपले काम चालूच ठेवले. १६ वर्षे चाललेल्या ह्या सुखी संसाराला पुन्हा तडा गेला. अखेरीस २००४ साली सारिका आणि कमल हसन ह्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यावेळी आपल्या दोन्ही मुलींनी वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सारिका पुन्हा एकाकी झाली.

चेहऱ्यावरील खोटे हसू दाखवत मनातील खचलेल्या भावना ती लपवू शकत नव्हती. मुंबईत येऊन नव्या उमेदीने तिने याच क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. कॉस्टयूम डिझायनर, साउंड डिझायनर अँड असिस्टंट म्हणून तिने भूमिका पार पाडल्या. सारिकाने मुंबईत फ्लॅट घेतला होता तो तिने तिच्या आईच्या नावे केला होता. सारिकाला वारसदारातून बेदखल करत हा फ्लॅट तिच्या आईने डॉ.ठाकुर यांच्या नावे केला आहे. मध्यंतरी सारिकाला बेघर राहावे लागल्याच्या बातम्या देखील पसरत होत्या.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुलाखतकार ‘तबसुम’ ह्या सारिकाच्या खास मैत्रीण. त्यांनीच एका मुलाखतीत सारिकाच्या आयुष्याबाबत हा खुलासा केला आहे. एवढ्या कठीण परिस्थीतीतदेखील तिचा संघर्ष अजून थांबलेला नसल्याची त्यांनी आठवण करून दिली. खरं तर आई आपल्या मुलांच्या सुखासाठी काहीही करायला तयार असते. परंतु सारिकाची आई ह्याला अपवाद म्हणावी लागेल. मृत्यूनंतर ही या आईने इस्टेटीतून बेदखल करत आपल्या मुलीला कुठल्याच आधाराशिवाय एकाकी राहण्यास भाग पाडले. असे वाईट जिवन कुणाच्याही वाट्याला न येवोत! 😰😞

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *