नवा गडी नवं राज्य मालिकेतील या अभिनेत्रीचा पती आहे मराठी चित्रपट दिग्दर्शक!

दुरदर्शनला झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेत राघव आणि आनंदीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे , साइशा भोईर आणि कीर्ती पेंढारकर या कलाकारांच्या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत.

पाहिले न मी तुला मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता त्यामुळे कित्येक महिने त्या अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. उपचारानंतर त्या पुन्हा एकदा झी मराठीवरील मालिकेत सक्रिय झालेल्या पाहुण त्यांच्या चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे. वर्षा दांदळे याची वच्छि आत्याची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. नवा गडी नवं राज्य या मालिकेत त्यांच्या भूमिकेला एक वेगळे महत्व आहे.

ह्या पात्राचा मालिकेत दरारा असला तरी त्यांची मालिकेतला लेक मात्र सर्वांची तारांबळ उडवताना पाहायला मिळते. या माय लेकीची जोडी मालिकेतून हिट झाली असल्याने या दोघींचे सिन कधी पाहायला मिळतील याची प्रेक्षक वाट पाहत असतात. मालिकेत वर्षा ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री कीर्ती मेहेंदळे पेंढारकर हिने. कीर्ती पेंढारकर हिने ललित २०५ या मालिकेतून महत्वाची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात खूप बडबडी, गप्पा मारणाऱ्या किर्तीला तिचा मूळ स्वभाव आहे अशाच धाटणीच्या भूमिका मिळताना दिसतात.

चोरीचा मामला हा किर्तीने अभिनित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटात किर्तीने आशाचे पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. लॉक डाऊनच्या काळात सोनी मराठी वाहिनीवर आठशे खिडक्या नऊशे दारं ही मालिका प्रसारित केली जात होती. घरात बसूनच मालिकेच्या कलाकारांनी शूटिंग केले होते त्यात कीर्ती देखील झळकली होती. या मालिकेतील तिची भूमिका पाहून नवा गडी नवं राज्य मालिकेचा निर्माता गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठे यांनी किर्तीला पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळवून दिली. भविष्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *